आत्मनिर्भर भारत कोविड सुरक्षा अभियानातून सरकारी उद्योगांना पाठबळ, हाफकीन बायोफार्मा करणार कोव्हॅक्सिन लसीच्या २२.८ कोटी मात्रांचे उत्पादन


आत्मनिर्भर भारत कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभाग तीन सरकारी उद्योगांना पाठबळ पुरवित आहे. यातूनच हाफकीन बायोफार्मा कोव्हॅक्सिन लसीच्या 22.8 कोटी मात्रांचे उत्पादन करणार आहे. भारत बायोटेककडून त्यासाठी तंत्रज्ञान मिळणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :आत्मनिर्भर भारत कोविड सुरक्षा अभियानाअंतर्गत केंद्रीय जैवतंत्रज्ञान विभाग तीन सरकारी उद्योगांना पाठबळ पुरवित आहे. यातूनच हाफकीन बायोफार्मा कोव्हॅक्सिन लसीच्या 22.8 कोटी मात्रांचे उत्पादन करणार आहे. भारत बायोटेककडून त्यासाठी तंत्रज्ञान मिळणार आहे. Halfkin Biopharma to support production of 22.8 crore units of Kovaxin vaccine through self-reliant Bharat Kovid Suraksha Abhiyan

लसीकरणासाठी पात्र असणाºया संपूर्ण लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारच्या मदतीने देशांतर्गत लस उत्पादनाचा वेग वाढविण्यात येत आहे. यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईतील हाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉपोर्रेशन, हैदराबादची इंडियन इम्युनॉलॉजिकल्स आणि उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील भारत इम्युनॉलॉजिकल्स अँड बायोलॉजिकल्स या कंपन्यांना सरकारने आर्थिक पाळबळ पुरविले आहे.

हैदराबाद येथील भारत बायोटेक कंपनीशी केलेल्या तंत्रज्ञान हस्तांतरण व्यवस्थेअंतर्गत हाफकिन बायोफार्मा ही महाराष्ट्र राज्य सरकारची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी पूर्वतयारी करीत आहे. हे उत्पादन हाफकिन कंपनीच्या परळ येथील संकुलात केले जाणार आहे. हाफकिन बायोफामार्चे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संदीप राठोड म्हणाले की एका वर्षात कोव्हॅक्सिन लसीच्या 22.8 कोटी मात्रांचे उत्पादन करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी हाफकिन बायोफार्मा कंपनीला केंद्र सरकारकडून 65 कोटी रुपयांचे तर महाराष्ट्र राज्य सरकारकडून 94 कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

राठोड म्हणाले, आम्हाला या कामासाठी आठ महिन्यांचा कालावधी मंजूर करण्यात आला आहे. लस उत्पादनाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. लस उत्पादनाची प्रक्रिया दोन टप्प्यांची आहे. लसीसाठीचा महत्त्वाचा औषधी भाग तयार करण्यासाठी आम्हाला जैव सुरक्षा पातळीची यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे. फिल फिनिश अर्थात अंतिम औषध उत्पादनाची यंत्रणा हाफकिनकडे यापूर्वीच स्थापन झालेली आह. ही सुरक्षा प्रमाणन यंत्रणा असून ती प्रामुख्याने सूक्ष्म जंतूंचा वापर केल्या जाणाºया कामाच्या ठिकाणी आवश्यक असते.अन्यथा श्वासाद्वारे सूक्ष्म जंतूचा शरीरात प्रवेश होऊन गंभीर आजार होऊ शकतात.

जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक मंडळाचे अध्यक्ष डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितले की सरकारी क्षेत्रातील मालमत्तांचा वापर करून लस उत्पादन क्षमता वाढविण्याचे प्रयत्न आहेत. देशातील लस उत्पादन क्षमता उभारण्यासाठी त्याचा दीर्घकाळ उपयोग होईल आणि देशात सध्या मोठ्या प्रमाणात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेला गती मिळेल.

हाफकिन बायोफार्मास्युटीकल्स कॉपोर्रेशन ही कंपनी मुंबईती असून महाराष्ट्र सरकारच्या मालकीची आहे. प्लेगच्या आजारावरील लसीचा शोध लावणारे डॉ. वाल्देमर हाफकिन या रशियन सूक्ष्मजंतूशास्त्रज्ञाच्या नावावरून नामकरण करण्यात आले आहे.

Halfkin Biopharma to support production of 22.8 crore units of Kovaxin vaccine through self-reliant Bharat Kovid Suraksha Abhiyan

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर