गेल्या सहा महिन्यात प्रदेशात १२ हजार कोटींची गुंतवणूक
प्रतिनिधी
श्रीनगर : 70 वर्षात देशात आणि जम्मू – काश्मीरमध्ये तीन कुटुंबांनी फक्त युवकांच्या भावना भडकवण्याचे काम केले. आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आली आहे, अशा कठोर शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमध्ये ठणकावले आहे.Had there been no curfew, don’t know how many lives would have been lost. Kashmir youth has been saved due to curfew
अमित शाह हे शुक्रवारपासून तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी जम्मू – काश्मीरमध्ये आहेत. त्यांनी शुक्रवारी सायंकाळी प्रदेशातील युथ क्लबच्या सदस्यांशी संवाद साधला. कलम ३७० संपुष्टात आणल्यानंतर प्रथमच काश्मीरमध्ये आलेल्या अमित शाह यांनी प्रदेशाचा विकासाची ‘शाह डॉक्ट्रिन’ तरुणांसमोर मांडली.
जम्मू – काश्मीरमध्ये परिवर्तनाची सुरूवात ५ ऑगस्ट, २०१९ रोजी झाली. मात्र, या परिवर्तनाला गती देण्याची जबाबदारी प्रदेशातील तरूणाईची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील नव्या काश्मीरच्या निर्माणामध्ये युवकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. काश्मीरमधून अडीच वर्षांपूर्वीपर्यंत दररोज दहशतवाद, हिंसाचार आणि दगडफेकीच्या बातम्या येत असत, मात्र आज येथील तरुण शिक्षण, रोजगार आणि उद्योग – व्यवसायाची भाषा बोलत आहेत. जम्मू – काश्मीरमध्ये सुरू झालेल्या या परिवर्तनास रोखण्याची क्षमता आज कोणामध्येही नाही. तरीही तसा कोणी प्रयत्न केल्यास त्यास सडेतोड उत्तर देणारे नेतृत्व आहे, असे अमित शहांनी सांगितले.
#WATCH: People questioned curfew, internet suspension. Had there been no curfew, don't know how many lives would have been lost. Kashmir youth has been saved due to curfew, internet suspension…3 families ruled for 70 yrs…Why were 40,000 people killed?: Home Minister Amit Shah pic.twitter.com/v8lxggQkbP — ANI (@ANI) October 23, 2021
#WATCH: People questioned curfew, internet suspension. Had there been no curfew, don't know how many lives would have been lost. Kashmir youth has been saved due to curfew, internet suspension…3 families ruled for 70 yrs…Why were 40,000 people killed?: Home Minister Amit Shah pic.twitter.com/v8lxggQkbP
— ANI (@ANI) October 23, 2021
काश्मीरच्या इतिहासात ५ ऑगस्ट, २०१९ हा दिवस सुवर्णाक्षरात नोंदविला गेल्याचे शाह यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, की दहशतवाद, हिंसाचार आणि घराणेशाहीच्या युगाचा अंत होऊन विकासाच्या युगास प्रारंभ झाला आहे. या प्रदेशातील युवक २०१९ पूर्वी देशाचा अर्थमंत्री, गृहमंत्री, राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती होण्याचा विचारही करू शकत नव्हता. कारण, गेल्या 70 वर्षात केवळ ८७ आमदार, ६ खासदार आणि तीन कुटुंबांचेच येथे वर्चस्व होते. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी येथे त्रिस्तरीय पंचायती राज व्यवस्था लागू केली, निवडणुका घेतल्या आणि ३० हजार लोकप्रतिनिधी आज काम करीत आहेत. त्यामुळे आज काश्मीरी तरुण – तरुणी पंचायत सदस्य, जिल्हा विकास परिषद सदस्य, आमदार, खासदार आणि राज्याचे मुख्यमंत्री बनू शकतात. मात्र, केवळ ३ कुटुंबापुरती मर्यादित लोकशाही पंतप्रधानांनी सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचविली. आपले राजकारण बंद होण्याती भीती असल्यानेच ती तीन कुटुंबे डिलीमीटेशनलाही विरोध करीत असल्याचा टोला शाह यांनी लगाविला.
डिलीमीटेशनची प्रक्रिया पूर्ण करून येथे तातडीने निवडणुका होतील आणि पुन्हा एकदा पूर्ण राज्याचा दर्जा प्रदान करण्यात येईल. तसे करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे, असे ते म्हणाले.
गेल्या 70 वर्षांत तीन कुटुंबांनी प्रदेशासाठी नेमके काय केले, याचा जाब विचारण्याची वेळ आता आली असल्याचे शाह यांनी सांगितले. या कालावधीमध्ये प्रदेशात ४० हजार बळी गेले, काश्मीरी तरुणांची एक पिढी विकासापासून दूर गेली. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांमुळे गेल्या सहा महिन्यात प्रदेशात तब्बल १२ हजार कोटींची नवी गुंतवणूक आली आहे, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ११५० जागा निर्माण झाल्या असून आणखी ११०० जागा तयार होणार आहेत, आयआयटी, आयआयएम, एनआयटी, आयआयएमसी, कर्करोग संस्था आल्या आहेत. त्यामुळे जन्मू – काश्मीरच्या विकासरथाला रोखणे आता कोणालाही शक्य नाही.
– ‘पीओके’मध्ये काय चाललंय…??
जम्मू – काश्मीरमध्ये आता कुठे विकासाची सुरूवात झाली आहे, त्यामध्ये आणखी बराच पल्ला गाठायचा आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीची शेजारीच असलेल्या पाकव्याप्त काश्मीरसोबत तुलना करून बघा, तेथे अद्यापही गरिबी आहे, बेरोजगारी आहे, विकासाची गंधही नाही. त्यामुळे विकासाच्या या चक्रास गती देण्याची जबाबदारी आता युवकांनीच पार पाडायची आहे.
जम्मू – काश्मीरमधील युवकांना नव्या संधी उपलब्ध देण्यासाठी ‘युथ क्लब’ ही संकल्पना यशस्वी करण्यामागे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या प्रयत्नांचे शाह यांनी कौतुक केले. जम्मू – काश्मीरमध्ये सध्या ४५०० युथ क्लब असून त्यांना शिक्षण, आरोग्य, क्रीडा, कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य केले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App