गुजरातच्या अनेक शहरांत अंत्यसंस्कारासाठीही मोठ्याला रांगा, मृत्यांच्या नातेवाईकांना करावे लागतेय दीर्घ प्रतिक्षा


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद – कोरोनाच्या वाढत्या साथीमुळे जनजीवनावर प्रचं विपरित परीणाम होत असून आजपर्यंत न अनुभवलेल्या अनेक गोष्टी नागरिकांना अनुभवाव्या लागत आहेत. सध्या राज्यात वेगळीच समस्या  भेडसावत आहे ती म्हणजे अंत्यसंस्काराची. कोरोना तसेच अन्य व्याधींनी मुळे दगावलेल्या मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गुजरातमधील अनेक शहरांत स्मशानभूमीत नातलगांना कित्येक तास प्रतिक्षा करावी लागत आहे. Gujarat facing real challenge of funeral

अंत्यसंस्कारासाठी अहमदाबादमध्ये आठ तास प्रतिक्षा करावी लागत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. वडज, दुधेश्वर या दोन प्रमुख स्मशानभूमींमध्ये गेले दोन दिवस मोठ्या संख्येने पार्थिव देह आणले जात आहेत.



कोणत्याही धर्मात अंत्यविधीला अनन्यसाधारण महत्व असते. यामागे प्रत्येकाच्या भावना गुंतलेल्या असतात. हिंदू नागरिक साधारणपणे सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करीत नाहीत, पण पार्थिव देह मोठ्या संख्येने आणले जात असल्यामुळे तसे करणे त्यांना भाग पडत आहे.

सुरतमधील उम्रा भागात रात्री एकाच वेळी चितेवर एकाच वेळी २५ पार्थिवांना अग्नी देण्यात आला. बडोद्यातही हीच स्थिती आहे. प्रशासनाने काही ठिकाणी धातूच्या चिता तयार केल्या आहेत, तर काही ठिकाणी नादुरुस्त झालेल्या सुविधा सज्ज केल्या आहेत.

Gujarat facing real challenge of funeral


 

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात