Gujarat Cabinet Expansion : जुने अख्खे मंत्रिमंडळच बदलले, टीम भूपेंद्र पटेलमध्ये २४ नवे चेहरे, ८० टक्के तरुण मंत्री

Gujarat Cabinet Expansion New Gujarat Ministers Swearing in ceremony today

Gujarat Cabinet Expansion :  विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी झाला. यादरम्यान पाच आमदारांनी एकत्र मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे, ज्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. Gujarat Cabinet Expansion New Gujarat Ministers Swearing in ceremony today


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातेत अख्खे मंत्रिमंडळच बदलण्यात आले आहे. नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात सर्व नव्यांना संधी देण्यात आली आहे. या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी गुरुवारी झाला. यादरम्यान पाच आमदारांनी एकत्र मंत्री म्हणून शपथ घेतली. यामध्ये राजेंद्र त्रिवेदी यांचा समावेश आहे, ज्यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

सर्व नव्या चेहऱ्यांना नव्या मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. यामध्ये राघव पटेल, जितू वाघानी, पूर्णेश मोदी, नरेश भाई पटेल, अर्जुन सिंह चव्हाण, हृषिकेश पटेल, कनुभाई देसाई, किरीट सिंह राणा, प्रदीप सिंह परमार, मनीषा वकील, हर्ष संघवी, ब्रिजेश मेर्जा, जगदीश भाई पांचाळ, जितू भाई चौधरी यांचा समावेश आहे. समाविष्ट आहे. 24 मंत्र्यांची शपथ घेतली जात आहे. यामध्ये 9 कॅबिनेट आणि 15 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

यापूर्वी हा शपथविधी सोहळा 15 सप्टेंबरला होणार होता. यासंदर्भात राजभवनात पोस्टरही लावण्यात आले होते. नंतर ती सर्व पोस्टर्स पुन्हा काढण्यात आली. भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

मंत्रिमंडळाची पहिली बैठक

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची पहिली मंत्रिमंडळ बैठक आज दुपारी 4.30 वाजता गांधीनगरमध्ये होणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली.

Gujarat Cabinet Expansion New Gujarat Ministers Swearing in ceremony today

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण