
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – ऑगस्ट महिन्यात १.१२ कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली आहे. ही रक्कम मागील वर्षी झालेल्या जीएसटी वसुलीच्या तुलनेत सुमारे ३० टक्के वाढीव असून महाराष्ट्रातून १५,१७५ कोटी रुपये जीएसटी वसुली झाली आहे.GST collection increased as compare to last year
ऑगस्ट महिन्यात आयात सेवांसोबतच देशांतर्गत आर्थिक व्यवहारामधून जमा झालेली रक्कम मागील वर्षीच्या ऑगस्टच्या तुलनेत २७ टक्के अधिक आहे. मागील सलग नऊ महिने जीएसटी वसुली एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असली तरी कोरोना आणि लॉकडाउनमुळे जूनमध्ये जीएसटी एक लाख कोटीच्या खाली घसरला होता.
लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये जीएसटी वसुलीने पुन्हा लाखाचा आकडा ओलांडल्याने अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसू लागली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यांत जीएसटी वसुलीत घसरण नोंदली गेली होती.
केंद्र सरकारने वसूल केलेल्या १,१२,०२० कोटी रुपयांमध्ये केंद्रीय जीएसटीचा वाटा २०,५२२ कोटी रुपये, तर आंतरराज्य मालवाहतुकीवर आकारल्या जाणाऱ्या आयजीएसटीचा हिस्सा ५६,२४७ कोटी रुपयांचा आहे. या रकमेमध्ये आयात मालावरील करापोटी २६,८८४ कोटी रुपयांचा समावेश आहे. तसेच ८,६४६ कोटी रुपये अधिभारही जमा झाला आहे.