GST Collection : मार्च महिन्यात जीएसटी संकलनाने गाठली आतापर्यंतची सर्वोच्च पातळी, तब्बल 1.42 लाख कोटी रुपयांचे संकलन

जानेवारी 2022 मध्ये संकलित 1,40,986 कोटी रुपयांचा पूर्वीचा विक्रम मोडत मार्च 2022 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक एकूण जीएसटी संकलन झाले आहे.GST Collection: GST collection reaches record high of Rs 1.42 lakh crore in March


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : मार्च 2022 मध्ये एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर महसूल संकलन 1,42,095 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,830 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,378 कोटी रुपये, आयजीएसटी अर्थात एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 74,470 कोटी रुपये ( माल आयातीवर संकलित झालेल्या 39,131 कोटी रुपयांसह) आणि उपकर महसूल 9,417 कोटी रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या 981 कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे.

जानेवारी 2022 मध्ये संकलित 1,40,986 कोटी रुपयांचा पूर्वीचा विक्रम मोडत मार्च 2022 मध्ये आत्तापर्यंतचे सर्वाधिक एकूण जीएसटी संकलन झाले आहे.



सरकारने नियमित समझोत्याच्या स्वरूपात म्हणून आयजीएसटीमधून सीजीएसटीला 29,816 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 25,032 कोटी रुपये चुकते केले आहेत. याशिवाय केंद्राने या महिन्यात आयजीएसटीचे 20,000 कोटी रुपये केंद्र सरकार आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 50:50 च्या प्रमाणात तात्पुरत्या आधारावर चुकते केले आहेत. नियमित आणि तात्पुरत्या समझोत्यानंतर मार्च 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 65646 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 67410 कोटी रुपये आहे. केंद्राने मार्च 2022 मध्ये राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 18,252 कोटी रुपये जीएसटी भरपाईही जारी केली.

मार्च 2022 मध्ये संकलित महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15% आणि मार्च 2020 मधील जीएसटी महसुलापेक्षा 46% अधिक आहे. या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 25% अधिक होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळणारा महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 11% अधिक आहे. फेब्रुवारी महिन्याचे दिवस कमी असूनही फेब्रुवारी 2022 या महिन्यात बनवलेल्या इ वे बिलांची संख्या जानेवारी 2022 (6.88 कोटी) च्या तुलनेत जास्त म्हणजे 6.91 कोटी आहे जी व्यावसायिक उलाढाली जलद गतीने सावरण्याचे द्योतक आहे.

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत अनुक्रमे ₹1.10 लाख कोटी, ₹1.15 लाख कोटी आणि 1.30 लाख कोटीं रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत सरासरी मासिक एकूण जीएसटी संकलन 1.38 लाख कोटी रुपये आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येण्यासह करचोरीविरोधी कारवाई , विशेषतः बनावट देयके देणाऱ्यांवर कारवाई या बाबी वाढलेल्या जीएसटी संकलनात योगदान देत आहेत. पर्यस्त शुल्क रचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने केलेल्या विविध दर तर्कसंगत उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे.

GST Collection: GST collection reaches record high of Rs 1.42 lakh crore in March

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात