वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मे 2022 मध्ये एकूण जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवाकर महसूल संकलन 1,40,885 कोटी रुपये इतके झाले आहे. यात सीजीएसटी अर्थात केंद्रीय वस्तू आणि सेवा करापोटी 25,036 कोटी रुपये, एसजीएसटी अर्थात राज्य सरकारच्या वस्तू आणि सेवा करापोटी 32,001 कोटी रुपये, आयजीएसटी म्हणजेच एकात्मिक वस्तू आणि सेवा करापोटी 73,345 कोटी रुपये (माल आयातीवर संकलित केलेल्या 37469 कोटींसह) आणि उपकर 10,502 कोटी रुपये ( मालाच्या आयातीवर संकलित केलेल्या 931 कोटी रुपये सह ) यांचा समावेश आहे.GST Collection 44% annual increase in GST collection after May, crosses Rs 1.40 lakh crore mark for third consecutive month
सरकारने समझोत्याच्या स्वरूपात आयजीएसटीमधून सीजीएसटीला 27,924 कोटी रुपये आणि एसजीएसटीला 23,123 कोटी रुपये चुकते केले आहेत.
नियमित समझोत्यानंतर मे 2022 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 52,960 कोटी रुपये आणि एसजीएसटी साठी 55,124 कोटी रुपये आहे.याव्यतिरिक्त, केंद्र सरकारने 31.05.2022 रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 86,912 कोटी रुपये जीएसटी भरपाई देखील जारी केली आहे.
मे 2022 चा जीएसटी महसूल हा मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 44% जास्त आहे.या महिन्यात, मालाच्या आयातीतून मिळणारा महसूल 43% अधिक नोंदवण्यात आला. आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) हा गेल्या वर्षी याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा 44% अधिक आहे.
जीएसटी लागू झाल्यापासून मासिक जीएसटी संकलनाने चौथ्यांदा तर मार्च 2022 पासून सलग तिसऱ्या महिन्यात 1.40 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे . मे महिन्यातील संकलन, जे एप्रिलच्या पहिल्या महिन्याच्या परताव्याशी संबंधित आहे , ते एप्रिलमध्ये नेहमीच कमी असते. मात्र तरीही मे 2022 मध्ये, जीएसटी महसूलाने 1.40 लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे. एप्रिल 2022 मध्ये एकूण ई-वे बिलांची संख्या 7.4 कोटी होती, जी मार्च 2022 मधील 7.7 कोटी ई-वे बिलांपेक्षा 4% कमी आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App