आता मुलांनाही कोरोना लस लवकर मिळण्यासाठी सरकारचे वेगवान प्रयत्न


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाच्या राष्ट्रीय मोहीमेला गती आलेली असतानाच आता १२ ते १८ वयोगटातील मुलांनाही कोरोना लस लवकरात लवकर मिळावी यासाठी सरकारने वेगवान प्रयत्न सुरू केले आहेत.Govt. planning for vaccination in all age group

देशभरात लसीकरणाला वेग आला आहे. १८ वर्षांच्या पुढील ७० टक्के लोकांनी किमान १ डोस घेतला आहे. मात्र आकडेवारीनुसार देशातील सुमारे ४४ कोटी किशोरवयीन मुलांचे लसीकरण अद्याप बाकी आहे.याबाबत तज्ञांनी सांगितल की मुलांचे लसीकरण सुरू झाल्यावर काही ना काही आजार असलेल्या मुलांचे लसीकरण करण्यास सरकारचे प्राधान्य राहील. ही मुले सुरक्षित झाल्यावर १२ वर्षांपुढील मुलांची लसीकरणाची मोहीम वेगवान करण्यात येईल.

प्रत्येक मुलाला लसीकरण झाले पाहिजे व त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालाकांना फार दूर जाण्याची वेळ येऊ नये, याची काळजी घेण्यात येईल. भारतीय औषध महानियंत्रकांनी झायडस कॅंडीला लसीला ऑगस्टमध्ये आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिली होती.

ही लस १२ वर्षांपुढील सर्व मुलांनाही दिली जाईल. यासाठी भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीच्याही मुलांवरील चाचण्या सध्या सुरू आहेत व पुढच्या आठवड्यापर्यंत याचे निकाल हाती येण्याची शक्यता आहे.

Govt. planning for vaccination in all age group

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती