विशेष प्रतिनिधी
मुंबई – महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी असलेल्या एकूण एक लाख पाच हजार ५०० घरेलू कामगारांना प्रत्येकी दीड हजारांप्रमाणे एकूण १५ कोटी ८२ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास सरकारने मान्यता दिली आहे. कडक निर्बंधांच्या काळात राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. Govt. give Rs 1500 to One lack house workers
एक लाख पाच हजार ५०० घरेलू कामगारांच्या बँक खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे प्रत्येकी दीड हजार रुपये वितरित करण्याची कार्यवाही विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्या स्तरावरून लवकरच करण्यात येत आहे, असे कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
नोंदणी असलेल्या १३ लाख बांधकाम कामगारांनाही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य थेट त्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत नऊ लाख १७ हजार बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. गेल्या वर्षीही कोविड विषाणच्या प्रादुर्भाव कालावधीत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजारांची मदत करण्यात आली होती.
विशेष बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App