वृत्तसंस्था
गोरखपूर : गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर हल्ला करणारा दहशतवादी आरोपी अहमद मुर्तजा विरोधात एनआयए न्यायालयाने शिक्षेची सुनावणी केली आहे. न्यायालयाने मुर्तजाला फाशीची शिक्षा सुनावल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, मुर्तजावर UAPA अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता आणि याला दहशतवादी मानले गेले होते. Gorakhnath Temple Terrorist Attacker Ahmed Murtaza Sentenced to Death by NIA Court
दरम्यान सोमवारी सुनावणीसाठी दहशतवादी अहमद मुर्तजा अब्बास याला कडक बंदोबस्तात लखनऊमधील एनआयए/एटीएसच्या न्यायालयात आणले गेले होते. एप्रिल २०२२ मध्ये मुर्तजाने गोरखनाथ मंदिरावर हल्ला केला होता. त्याने हातात कोयता घेऊन गोरखनाथ मंदिर परिसरात प्रचंड दहशत माजवली होती. सुरुवातीला तो मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु नंतर त्याचे संबंध पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआय आणि अन्य दहशतवादी संघटनांची असल्याचे सिद्ध झाले.
Gorakhnath Mandir Attack : मुर्तजा अब्बासीचे जिहादी कनेक्शन तपासण्यासाठी यूपी पोलिसांचे ATS नवी मुंबईत दाखल!!
६० दिवसाच्या सुनावणीनंतर शिक्षा जाहीर
शिक्षेची सुनावणी झाल्यानंतर एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, ‘६० दिवसांच्या सुनावणीनंतर आज शिक्षा सुनावली आहे. यामध्ये भादंवि कलम १२१ अन्वये फाशीची शिक्षा आणि ३०७ नुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सुनावणीच्या वेळी सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले आणि न्यायालयाने हे पुरावे योग्य असल्याचे मान्य केले. यावरूनच पोलिसांचा तपास योग्य असल्याचा दिसून आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी देशाविरोधातील कटाचा पर्दाफाश केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App