
RTPCR Test : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना महामारीच्या सद्य:परिस्थितीवर माध्यमांना संबोधित केले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, राज्यनिहाय सक्रिय रुग्णसंख्या घटत आहेत. 26 राज्यांमध्ये 15% पॉझिटिव्हिटी रेट आहे, तर सहा राज्यांमध्ये 5 ते 15% रुग्ण आहेत. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदिगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबारमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरातमध्येही दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. Good News RTPCR test is no longer required to move from one state to another, new guideline from the Center
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना महामारीच्या सद्य:परिस्थितीवर माध्यमांना संबोधित केले. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, राज्यनिहाय सक्रिय रुग्णसंख्या घटत आहेत. 26 राज्यांमध्ये 15% पॉझिटिव्हिटी रेट आहे, तर सहा राज्यांमध्ये 5 ते 15% रुग्ण आहेत. मध्य प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा, चंदिगड, लडाख, दमण आणि दीव, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबारमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड, बिहार आणि गुजरातमध्येही दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे.
RTPCR टेस्टची अट शिथिल
आरोग्य मंत्रालयाने असेही म्हटले आहे की, आता एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी आरटीपीसीआर चाचणी घेण्याची गरज नाही. इतकेच नाही तर एखाद्या रुग्णास रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जात असला तरी आरटीपीसीआर चाचणी घेण्याची गरज भासणार नाही. म्हणजेच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेताना आरटीपीसीआर चाचणी आता गरजेची नाही.
कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी देशभरात लसीकरण कार्यक्रम सुरू आहे. तथापि, यावेळी सर्वात मोठी अडचण म्हणजे लसीचे पुरेसे डोस उपलब्ध नाहीत. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, राज्यांनी लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना सध्या प्राधान्य दिले पाहिजे.
लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना राज्य सरकारने प्राथमिकता दिली पाहिजे. मोठ्या संख्येने लोक दुसर्या डोसची वाट पाहत आहेत, त्यांच्याकडे सर्वात आधी लक्ष द्यावे. राजेश भूषण म्हणाले की, या संदर्भात राज्य सरकार कमीत कमी 70 टक्के लस केंद्राकडून दुसर्या डोससाठी आरक्षित ठेवू शकते, तर उर्वरित 30 टक्क्यांमधून पहिला डोस दिला जाऊ शकतो.
COVID19 | More than 1 lakh active cases in 13 states, 50,000 to 1 lakh active cases in 6 states and less than 50,000 active cases in 17 states: Ministry of Health pic.twitter.com/pKL9WSI4sl
— ANI (@ANI) May 11, 2021
सक्रिय रुग्णसंख्येत कमालीची घट
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात अशी 13 राज्ये आहेत जिथे 1 लाखाहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत. 6 राज्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या 50,000 ते 1 लाख यादरम्यान आहे. तर अशी 17 राज्ये आहेत जिथे 50,000 पेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत.
लव अग्रवाल म्हणाले की, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब, आसाम, जम्मू-काश्मीर, गोवा, हिमाचल प्रदेश, पुडुचेरी, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशात दररोज नवीन रुग्णसंख्येत वाढ होत आहे. 16 जानेवारीपासून सुरुवात झालेल्या लसीकरण अभियानांतर्गत देशभरात आतापर्यंत 17.10 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. सध्या देशभरात कोरोना लसीचे 97.61 लाखांहून अधिक डोस उपलब्ध आहेत.
Good News RTPCR test is no longer required to move from one state to another, new guideline from the Center
महत्त्वाच्या बातम्या
- Inspiring : दुर्मिळ आजार असूनही डोंबिवलीच्या महिला डॉक्टरची अखंड रुग्णसेवा, कोरोनाने गाठल्यावरही मानली नाही हार
- शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी : PM Kisan योजनेचा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा
- Wheat Procurement : केंद्राकडून शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ४९,९६५ कोटी रुपये, ३४.०७ लाख शेतकऱ्यांना फायदा
- ठाकरे सरकारचा १८ ते ४४ वयोगटातील लसीकरणाला ब्रेक, राजेश टोपे म्हणाले, तूर्तास ज्येष्ठ नागरिकांना देणार प्राधान्य
- इटलीत नर्सने महिलेला नजरचुकीने एकाच वेळी दिले लसीचे 6 डोस, मग घडले असे काही…