Good News ! ब्लॅक फंगसची औषधे जीएसटी मुक्त ; रेमडेसिवीरवर 7 टक्के सूट तर रुग्णवाहिकेवरील जीएसटी 12 टक्क्यांनी कमी ; केंद्र सरकारचा मोठा दिलासा


  • जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषध जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोना संबंधित आरोग्य सुविधा, औषधं, लसी यांच्याबाबत जीएसटी कौन्सिलने काही शिफारसी स्वीकारल्या आहेत. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगस अर्थात काळी बुरशी या आजारावरील औषधावरचा कर माफ केला आहे. मात्र अशात कोरोना व्हॅक्सिन अर्थात कोरोना लसीवर लावण्यात आलेल्या पाच टक्के GST मात्र कायम ठेवण्यात आला आहे.अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.Good News! Black fungus drugs GST free; 7 per cent rebate on Remedesivir and 12 per cent reduction on GST on ambulances; Great relief from the central government

GST Council च्या आज झालेल्या बैठकीत ब्लॅक फंगसचे औषधे जीएसटी मुक्त करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. रेमडेसिवीरवरील जीएसटीच्या दरात 7 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच व्हॅक्सिनवर आकारण्यात येणारी 5 टक्के जीएसटी कायम राहणार आहे.  30 सप्टेंबर 2021पर्यंत जीएसटी कपातीचा निर्णया लागू राहणार असल्याचंही सीतारामन यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. आज 44 वी जीएसटी कौन्सिल पार पडली. यावेळी कोरोना संबंधित मेडिकल इक्विपमेंट्स आणि औषधांवरील जीएसटीत कपात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

आजच्या बैठकीत रेमडेसिवीरील जीएसटी दर 12 टक्क्यावरून कमी करून 5 टक्के करण्यात आला. Tocilizumab, Amphotericin B ही ब्लॅक फंगसची औषधे पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्यात आली आहेत. तसेच मेडिकल ग्रेड ऑक्सिजनसाठीचा जीएसटी दर 12 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आला आहे.

यातही कपात- 

आता बायपॅप मशीन, ऑक्सिजन कन्स्ट्रेटर, व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटरला जीएसटीचेच दर लागू राहतील. त्याशिवाय कोविड टेस्टिंग किट, हँड सॅनिटाझर, टेम्परेचर चेक इक्विपमेंट्सवरील जीएसटी कपात करून 5 टक्के करण्यात आली आहे.

रुग्णवाहिकेवरील जीएसटी दर कमी करून 12 टक्के करण्यात आला आहे. सध्या रुग्णवाहिकेवर 28 टक्के जीएसटी आकारला जातो.

कोरोनाशी संबंधित ज्या साहित्यांवर सूट देण्यात आली आहे. त्याबाबतची अधिसूचना उद्या जारी करण्यात येणार आहे. येत्या 30 सप्टेंबर 2021 पर्यंत ही कपात लागू राहील. त्याच दिवशी म्हणजे 30 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक होणार आहे.

BOX

जीएसटी परिषदेने कोरोना व्हॅक्सिनवरील 5 टक्के जीएसटी दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यात कोणतंही राजकारण नाही. व्हॅक्सिनवर 5 टक्के जीएसटी आहे. त्यातील 75 टक्के लसींची खरेदी केंद्र सरकार करत आहे. मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्याचा सामान्य जनतेला फटका बसण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Good News! Black fungus drugs GST free; 7 per cent rebate on Remedesivir and 12 per cent reduction on GST on ambulances; Great relief from the central government

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती