एअर इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी : 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार करू शकतील अर्ज, लेखी परीक्षेच्या आधारे निवड

प्रतिनिधी

एअर इंडियामध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडने (AIESL) ने 371 पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. याअंतर्गत एअरक्राफ्ट टेक्निशियनच्या पदांवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी उमेदवार 20 मार्चपर्यंत एअर इंडियाच्या www.aiasl.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.Golden Job Opportunity in Air India Candidates up to 40 years can apply, selection based on written test

शैक्षणिक पात्रता

एअरक्राफ्ट टेक्निशियन (देखभाल आणि ओव्हरहॉल शॉप्स) या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संबंधित डिप्लोमा असणे आवश्यक आहे. मात्र, ओबीसी आणि एससी आणि एसटी उमेदवारांनाही 5 टक्के सूट देण्यात आली आहे.



अर्जाची फीस किती?

भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना अर्जासाठी 1000 रुपये भरावे लागतील तर SC, ST आणि माजी सैनिकांना 500 रुपये भरावे लागतील.

वयोमर्यादा

भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी विविध श्रेणींसाठी वयोमर्यादा स्वतंत्रपणे ठेवण्यात आली आहे. उदाहरणार्थ, सर्वसाधारण आणि माजी सैनिकांसाठी कमाल वय 35 वर्षे ठेवण्यात आले आहे, तर 38 वर्षांपर्यंतचे OBC प्रवर्गातील उमेदवार अर्ज करू शकतात. एससी-एसटीसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे ठेवण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया

भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड लेखी चाचणी, स्क्रीन टेस्ट आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.

किती मिळेल वेतन?

एअर इंडियाच्या भरतीमध्ये निवड झाल्यावर, उमेदवारांना दरमहा 95 हजार ते 1 लाख 80 हजार रुपये पगार दिला जाईल.

असा करा अर्ज

सर्वप्रथम www.aiasl.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
एअरक्राफ्ट टेक्निशियन रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
वैयक्तिक तपशील भरून सबमिट करा.
एअरक्राफ्ट टेक्निशियन फॉर्म आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म फी भरा. फॉर्म सबमिट करा.
फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.

Golden Job Opportunity in Air India Candidates up to 40 years can apply, selection based on written test

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात