गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेशाच्या चर्चांना उधाण


गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. मात्र, नाईकांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. Goa Former CM Ravi Naik Resigns As Cong MLA, Party Strength In House Reduces To 31, Likely To Join BJP


वृत्तसंस्था

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने मिळत आहे. मात्र, नाईकांनी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. या वर्षी ऑक्टोबरमध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो यांनी काँग्रेस आमदारपदाचा राजीनामा दिला होता आणि नंतर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले होते.आता काँग्रेसचे तीनच आमदार

नाईक यांच्या राजीनाम्यामुळे राज्याच्या 40 सदस्यीय विधानसभेत काँग्रेस आमदारांचे संख्याबळ तीनवर आले आहे. गोव्यातील फोंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नाईक यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलेही होती, ज्यांनी गेल्या वर्षी सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

राजीनामा सादर केल्यानंतर नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुढे काय योजना आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Goa Former CM Ravi Naik Resigns As Cong MLA, Party Strength In House Reduces To 31, Likely To Join BJP

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती