विनायक ढेरे
गुलाम नबी आझाद यांची खदखद अखेर अंतिमरीत्या बाहेर पडली. तब्बल 40 हून अधिक वर्षांचे काँग्रेसशी असलेले नाते त्यांनी तोडून टाकले. गुलाम नबी आझाद काँग्रेस मधून कायमचे “आझाद” झाले आहेत, पण आता राजकीय दृष्ट्या ते कुणाची “गुलामी” करणार??, हा प्रश्न पुढे आला आहे!! Ghulam Nabi Azad He will be free forever from Congress and will enslave someone
जी 23 गटाची नाराजी
2014 च्या झालेल्या महापराभवानंतर गेल्या काही वर्षांपासून गुलाम नबी आझाद यांच्यासह काँग्रेसचे 23 नेते काँग्रेसच्या हायकमांड वर विशेषतः राहुल गांधी यांच्यावर नाराज होते. काँग्रेसमध्ये ज्येष्ठ – वरिष्ठ नेत्यांना डावलले जात आहे. त्यांना काम दिले जात नाही, असा त्यांचा आरोप होता. याविषयी त्यांनी वारंवार पत्र लिहून जाहीर नाराजी प्रकट केली होतीच. परंतु काँग्रेस हायकमांड वर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि अखेरीस गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज राजीनामा दिला. गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांना 5 पानी पत्र लिहून आपल्या स्वतःच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा घेतलाच, काही विशिष्ट अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणून राजीनामा देत असल्याचा खुलासा त्यांनी पत्रात केला आहे.
आझादां पुढचे पर्याय कोणते??
आझाद यांचे काँग्रेसशी नाते तुटले आहे. आता उरलेल्या राजकीय जीवनात ते कोणती दिशा पकडतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अर्थातच त्यासाठी त्यांच्यापुढे काही राजकीय पर्याय सुनिश्चित आहेत. किंबहुना असे राजकीय पर्याय सुनिश्चित केल्याशिवाय गुलाम नबी आझाद यांच्यासारखा वर्षानुवर्षे राजकारणात मुरलेला नेता आपला काँग्रेस पक्ष सोडून इतरत्र जातच नाही. त्यानुसार गुलाम नबी आझाद यांनी आपला राजाकीय पर्याय निश्चित केला असणार हे उघड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी त्यांची चांगली राजकीय केमिस्ट्री आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या हायकमांडने ही “राजकीय केमिस्ट्री” ओळखूनच गुलाब नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांना बराच काळ मूलभूत निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले होते. त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे काँग्रेस हायकमांडसाठी गैर लागू नव्हते. पण काँग्रेसमध्ये राहून मोदींशी “राजकीय केमिस्ट्री” जुळवायची हे हायकमांडला मान्य नव्हते. गुलाब नबी आझाद यांना काँग्रेसमध्ये राहून स्वतःच्या “टर्म्स अँड कंडिशन्स”वर राजकारण करायचे होते. काँग्रेस राजकीय संस्कृतीच्या दृष्टीने ते कधीच शक्य नव्हते. पण काँग्रेस गेली 8 – 10 वर्षे पराभवाच्या छायेत असल्याने गुलाम नबी आझाद यांच्यासारख्या नेत्यांच्या “स्वतंत्र दृष्टिकोन” हाय कमांडने सहन केला होता!!
काँग्रेस हायकमांडचे राजकारण
गुलाम नबी आझाद जर काँग्रेसमध्ये राहून आपला वेगळा सूर मोठा लावू शकतात आणि राजकारण खेळू शकतात, तर हायकमांड देखील कमी नव्हते. हायकमांडने त्यांना अपेक्षित असणारे निर्णय तर घेतले नाहीतच, पण त्यांच्याबरोबर राजकारण खेळताना त्यांना पक्षाबाहेरही काढलेला आहे, की जे त्यांना अपेक्षित होते!! अखेरीस कंटाळून गुलाब नबी आझाद काँग्रेस बाहेर पडले आहेत. काँग्रेसचे सध्या वाईट दिवस असल्यामुळे गुलाब नबी आझाद यांच्या बाजूने मीडियाची सहानुभूती असणे स्वाभाविक आहे म्हणून तर त्यांनी काँग्रेस सोडल्याच्या बातम्या सध्या ट्रेंडिंगला आहेत. पण आझाद सारखा “स्वतंत्र सूर” काँग्रेसमध्ये ऐकून घेतला जात नाही, हा इतिहास आहे. काँग्रेसच्या विद्यमान हायकमांडने तो ऐकून घेतला. पण त्यांची आणि मोदींची केमिस्ट्री मात्र कधीच मान्य केली नाही आणि याचाच परिणाम म्हणून गुलाम नबी आझाद यांना काँग्रेस बाहेर पडणे एका अर्थाने भाग पडले आहे!!
आझादंकडे तरी यशाचा फॉर्म्युला कुठेय??
भले आझाद यांच्या 5 पानी पत्रात विविध कारणे विशद केली असतील, काँग्रेस हायकमांडच्या “इन्ऍक्टिव्ह” धोरणावर शरसंधान साधले असेल, पण मग खुद्द गुलाम नवी आझाद हे असा काँग्रेसचा विजयाचा कोणता फॉर्म्युला आणू शकणार होते की ज्यामुळे काँग्रेस पुन्हा एकदा देशात वाढू शकली असती?? एकटे आझादच नाहीत तर त्यांच्या नेतृत्व नेतृत्वाखालचे g23 गटाचे नेते देखील असे कोणते स्वतंत्र राजकीय कर्तृत्व दाखवू शकले आहेत की ज्यामुळे काँग्रेसच्या राजकीय अपयशाचे रूपांतर मोठ्या यशात झाले आहे?? हे खरे प्रश्न आहेत!! काँग्रेस हायकमांड कडे काँग्रेसच्या राजकीय दुरावस्थेवर उत्तर नाही हे खरे, पण तसेच उत्तर जी 23 गटाकडे देखील नाही, ही पण वस्तुस्थिती नाही का?? केवळ पत्रापत्री आणि कागदी उपाययोजना सुचवून काँग्रेसला सत्तेची संजीवनी मिळणार आहे का?? हे मूलभूत प्रश्न आहेत. आणि ते आझाद यांच्या आधीच्या पत्रांनी सोडवलेले नाहीत आणि आजच्या पाच पाणी पत्रामध्ये तसे उपाय सापडत नाहीत.
स्वतंत्र पक्षाचा पर्याय
राहता राहिला यांचा दुसरा राजकीय पर्याय आझाद आगामी जम्मू कश्मीर विधानसभेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र प्रादेशिक पक्ष उभा करू शकतात. थोडक्यात ते कॅप्टन अमरिंदर सिंग होऊ शकतात आणि त्यांचा जो कुठला आझाद काँग्रेस वगैरे पक्ष भाजपशी युती करून जम्मू-काश्मीरच्या निवडणुका लढवू शकतो. म्हणजे एकूण तोच फॉर्म्युला जो काँग्रेसच्या हायकमांडला मान्य नाही आणि जो मोदींच्या राजकीय स्कीम मध्ये फिट बसणारा ठरणार आहे!! हा फॉर्म्युला आझाद फॉलो करू शकतात. गुलाम नबी आझाद यांच्या काँग्रेस मधल्या काँग्रेस मधून बाहेर पडण्याचे हे कदाचित नजीकच्या भविष्यातले राजकीय फलित असू शकते.
थेट भाजपमध्ये प्रवेश??
गुलाम नबी आझाद यांच्या समोरचा तिसरा पर्याय म्हणजे थेट भाजपमध्ये प्रवेश करणे. म्हणजे पुन्हा काँग्रेस हायकमांडच्या मनातला संशय पक्का करण्यासारखेच आहे. आझाद आणि पंतप्रधान मोदी यांची “राजकीय केमिस्ट्रीच” तर काँग्रेस हायकमांडला खटकत होती. आझाद भाजपमध्ये प्रवेश करून या हायकमांडच्या संशयावरच शिक्कामोर्तब करतील का??, हा प्रश्न आहे. याचे उत्तर लवकरच अपेक्षित आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App