युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहीमेचे जर्म राजदूतांकडून कौतुक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं विशेष मोहिम हाती घेतली आहे. ऑपरेशन गंगा अंतर्गत ही बचाव मोहिम राबवली जात आहे. भारताच्या या सेवेचे भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी कौतुक केलं आहे.German Ambassador praises repatriation of Indians stranded in Ukraine

लिंडनर म्हणाले, भारताकडं उत्कृष्ट परराष्ट्र सेवा असून याचा वापर कसा करायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. हे केवळ युक्रेनच्या किंवा युरोपियन युनियनच्या स्थितीबाबत नव्हे तर जागतीक व्यथेबद्दल आहे. आपल्या सर्वांना एकत्रितपणे या स्थितीविरोधात उभं रहायला हवे.पहिल्या दिवसापासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे खोटं बोलत आहेत. त्यांनी युक्रेनवर केवळ आक्रमण केलेलं नाही तर तिथल्या रशियन भाषिकांना ते बचाव करत आहेत. सध्या युक्रेनमध्ये गोळीबार आणि बॉम्बवर्षाव सुरु आहे. ठअळड ही एक संरक्षण आघाडी आहे. आम्ही कधीही आक्रमक झालेलो नाही, कधीही कोणावर आक्रमण केलेलं नाही, असंही लिंडनर यांनी म्हटलं आहे.

सध्याची युद्धाची परिस्थिती भयानक असून पुतिन यांनी हे थांबवायला हवं. आमची भूमिका ही इतर युपरोपियन देशांप्रमाणंच आहे. आम्ही मोठ्या प्रमाणावर रशियन गॅसवरील अवलंबित्व कमी केलं आहे, असंही लिंडनर यांनी सांगितलं.

German Ambassador praises repatriation of Indians stranded in Ukraine

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी