जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरी आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत तीन जणांवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन गैर-काश्मिरी मजूर जखमी झाले आहेत.General target again in Kashmir Non-Kashmiri civilians targeted by terrorists, 3 killed in 24 hours, 1 killed
वृत्तसंस्था
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी गैर-काश्मिरी आणि राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत तीन जणांवर दहशतवाद्यांनी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यांमध्ये एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन गैर-काश्मिरी मजूर जखमी झाले आहेत.
सोमवारी, पुलवामा जिल्ह्यातील गंगू गावात सर्कल रोडवर बंदुकधारी दहशतवाद्याने एका स्थलांतरित कामगाराची गोळ्या झाडून हत्या केली. बिसुजित कुमार असे या मजुराचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. आज तासाभरातील हा दुसरा हल्ला आहे. पोलिसांनी सांगितले की, जखमी मजुराला पुलवामा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळाला सुरक्षा दलांनी वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.
स्थानिक नागरिकाची हत्या
बडगाम जिल्ह्यातील गोटपोरा येथे दहशतवाद्यांनी तजमुल मोहिउद्दीन नावाच्या व्यक्तीला गोळ्या घातल्या. मोहिउद्दीन यांच्यावर त्यांच्या घराजवळ हल्ला करण्यात आला. गोळी लागल्याने त्यांना रुग्णालयात नेले जात होते, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
यापूर्वी रविवारी सुतारकाम करणाऱ्या एका स्थलांतरित मजुरावरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या होत्या. पुलवामा जिल्ह्यात ही घटना घडली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App