Gates with Modi : ‘’अद्भुत क्षमता, प्रेरणादायी प्रवास’’ पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर बिल गेट्स यांचे भारताबद्दल गौरवोद्गार!

Gates and Modi

भारत दौऱ्यात मोदींसोबत झालेल्या भेटीबाबत ‘गेट्स नोट्स’ या ब्लॉगद्वारे दिली सविस्तर माहिती, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

विशेष प्रतिनिधी

मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स हे भारत दौऱ्यावर आहेत, त्यांनी काल(शुक्रवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये विज्ञान आणि संशोधनाच्या मदतीने भारत आणि जगातील असमानता कमी करण्यावर चर्चा झाली. बिल गेट्स यांनी भारताच्या कोविड-19 व्यवस्थापन, लसीकरण मोहीम, डिजिटल आरोग्य आणि आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या यासारख्या उपक्रमांची प्रशंसा केली. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेबाबत बिल गेट्स यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सविस्तरपणे माहितीही दिली आहे. Gates with Modi Amazing ability inspiring journey Bill Gates praises India after meeting Prime Minister Modi

बिल गेट्स आपल्या ब्लॉगमध्ये म्हणतात, या आठवड्यात मी भारतात होतो. मी शिकलो की तिथे आरोग्य, जलवायु परिवर्तन आणि अन्य महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये कशाप्रकारे नाविन्यपूर्ण काम होत आहे. अशावेळी जेव्हा जगासमोर अनेक आव्हानं आहेत, भारतासारख्या गतिशील आणि रचनात्मक ठिकाणाचा प्रवास करणे प्रेरणादायी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची शुक्रवारची माझी भेट हे माझ्या दौऱ्याचे खास वैशिष्ट्य आहे. भारत आणि जगभरातील विषमता कमी करण्यासाठी विज्ञान आणि नवकल्पना कशी मदत करू शकतात याविषयी आम्ही बोललो.

मोदींबरोबरची भेट माझ्या दौऱ्यातील प्रमुख  वैशिष्ट-

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची शुक्रवारची भेट हे माझ्या या दौऱ्याचे वैशिष्ट्य आहे. ते त्यांच्या वेळबद्दल उदार होते. भारत आणि जगभरातील विषमता कमी करण्यासाठी विज्ञान आणि नवकल्पना कशी मदत करू शकतात याविषयी आम्ही बोललो तेव्हा ते त्यांच्या वेळेबद्दल उदार होते. करोना महामारीमुळे मी मागील तीन वर्षांपासून फार जास्त प्रवास करू शकलो नव्हतो. पंतप्रधान मोदी आणि मी संपर्कात राहिलो. आम्ही प्रामुख्याने कोरना लसीचा विकसित करणे आणि भारताच्या आरोग्य प्रणालीत गुंतवणुकीबाबत बोलत राहिलो. भारताकडे अनेक सुरक्षित, प्रभावी आणि परवडणाऱ्या लसींची निर्मिती करण्याची अद्भुत क्षमता आहे. त्यापैकी काही गेट्स फाउंडेशनच्या सहकार्याने आहेत. भारतात उत्पादित केलेल्या लसींनी महामारी दरम्यान लाखो लोकांचा जीव वाचवला आहे आणि जगभरातील इतर आजारांनीही प्रतिबंध केला आहे.

भारताकडे अद्भुत क्षमता –

अनेक सुरक्षित, प्रभावी आणि परवडणाऱ्या लसींची निर्मिती करण्याची भारताकडे अद्भुत क्षमता आहे, त्यापैकी काही गेट्स फाऊंडेशनद्वारे समर्थित आहेत. भारतात निर्माण लसींनी साथीच्या आजारादरम्यान लाखो लोकांचे प्राण वाचवले आहेत आणि जगभरातील इतर आजारांना प्रतिबंध केला आहे. नवीन जीवनरक्षक साधने तयार करण्याबरोबरच भारत त्यांचे वितरण करण्यातही उत्कृष्ट आहे. भारताच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेने कोविड लसींचे २.२ बिलियन पेक्षाही अधिक डोस वितरित केले आहेत. 

Co-WIN जगासाठी एक मॉडेल आहे आणि मी देखील याला मानतो –

भारताने Co-WIN प्लॅटफॉर्म तयार केला आहे. ज्याच्या मदतीने कोट्यवधि लोक स्वत:साठी करोना लस घेण्याची वेळ निश्चित करू शकत आहेत आणि त्यांना लसीकरणाचे प्रमाणपत्रही मिळत आहे. भारतातील सर्व लसीकरणाच्या मदतीसाठी Co-WIN प्लॅटफॉर्मचा विस्तार केला जात आहे. पंतप्रधान मोदींचे म्हणणे आहे की Co-WIN जगासाठी एक मॉडेल आहे आणि मी देखील याला मानतो.

महामारीच्या काळात भारत २०० दशलक्ष महिलांसह ३०० दशलक्ष लोकांना आपत्कालीन डिजिटल पेमेंट हस्तांतरित करण्यातही सक्षम होता. हे केवळ शक्य झाले कारण भारताने आर्थिक समावेशनाला प्राधान्य दिले आहे. डिजिटल आयडी प्रणालीमध्ये गुंतवणूक केली आहे (आधार कार्ड) आणि डिजिटल बँकिंगसाठी नाविन्यपूर्ण व्यासपीठ तयार केले आहे. बिल गेट्स यांनी हेही म्हटले की, मला आशा आहे की भारत ही प्रगती सुरू ठेवेल आणि आपल्या नवीन गोष्टी जगाबरोबर शेअर करेल. मला अभिमान आहे की गेट्स फाउंडेशन या वाटचालीत भागीदार असेल.

Gates with Modi Amazing ability inspiring journey Bill Gates praises India after meeting Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात