G 23 Congress : काँग्रेसमध्ये सुधारणा सोडा; जी 23 मधले नेते स्वतःच्या मुलांची राजकीय सोय लावण्याच्या नादात!!


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशासह 5 राज्यांमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राजकीय उचल खाल्लेल्या जी 23 नेत्यांनी काँग्रेसमध्ये सामूहिक नेतृत्वाची मागणी करत गांधी परिवारावर हल्लाबोल केला. पण आता जी 23 नेत्यांमध्येच वेगळे राजकीय चलबिचल सुरू झाल्याचे दिसून येत आहे.G 23 Congress: Leave reforms in Congress; Leaders of G23 in the mood of making political arrangements for their own children

 भूपिंदरसिंग हुड्डा – राहुल गांधी भेट

जी 23 गटाचे नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेतली. जी 23 गटाचे नेते आणि राहुल गांधी यांच्यातले राजकीय संवादक बनण्यासाठी भूपिंडर हुड्डा हे राहुल गांधी यांच्या भेटीला गेले होते, अशा बातम्या आल्या.पण प्रत्यक्षात भूपिंदरसिंग हुड्डा यांनी राहुल गांधी यांची भेट हरियाणा प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वा संदर्भात घेतल्याचे बोलले जात आहे. हरियाणा प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी सध्या माजी केंद्रीय मंत्री कुमारी शैलजा आहेत. त्यांना बाजूला करून आपला मुलगा आणि राज्यसभेचे खासदार दीपेंदर हुड्डा यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवावे, अशी भूपिंदरसिंग हुड्डा यांची इच्छा आहे. यासाठीच त्यांनी राहुल गांधींची भेट घेतल्याची चर्चा आहे.

राजकीय सोय

आज सकाळी गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी जी 23 गटाच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर भूपिंदरसिंग हुड्डा हे राहुल गांधी यांची भेट घ्यायला त्यांच्या निवासस्थानी गेले होते. सुमारे एक तासभर राहुल गांधी आणि भूपिंदरसिंग हुड्डा यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ते पुन्हा गुलाब नबी आझाद यांच्या निवासस्थानी आले.

या पार्श्वभूमीवर पक्षात फार मोठ्या प्रमाणावर बदल होणे तर सोडाच प्रत्यक्षात जी 23 गटाचे नेते देखील आपल्या मुलांची राजकीय सोय लावण्यासाठी गांधी परिवाराशी जुळवून घेत आहेत, हे भूपिंदरसिंग हुडा आणि राहुल गांधी यांच्या भेटीच्या निमित्ताने स्पष्ट झाल्याचे दिसत आहे.

G 23 Congress: Leave reforms in Congress; Leaders of G23 in the mood of making political arrangements for their own children

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था