वृत्तसंस्था
चेन्नई : मुलांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने ते आता हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करणार नाहीत, चिंतेने ग्रासलेल्या आणि हताश झालेल्या वडिलांनी चक्क आपले दोन कोटी रुपयांचे घर देवस्थानला दान केले. ही घटना म्हणजे धर्मपरिवर्तनाचे हिंदू समुदायाबरोबरच कुटुंबावर होणाऱ्या दुष्परिणामाचे हे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. From the father as the children converted to Christianity Two crore house donated
कांचीपूरामचे रहिवासी आणि माजी आरोग्य अधिकारी असलेले वेलायुधम ( वय ८०) यांनी घर देवस्थानला दान केले. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांच्या मुलांनी आपले जोडीदार ख्रिश्चन निवडले आहेत.
तसेच त्यासाठी हिंदू धर्मही सोडला. त्यामुळे संतप्त झालेल्या वेलायुधम यांनी घरच देवस्थानला दान केले. मुलांनीच ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याने आता हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार ते करणार नाहीत, याची चिंता त्यांना पडली. “माझ्याकडे २६८० चौरस फुटांचे घर आहे, ज्याची किंमत सुमारे २ कोटी रुपये आहे. ज्यांनी धर्म बदलला त्यांना मला घरे द्यायची नाहीत.
म्हणूनच मी ते कुमारकोट्टम मुरुगन मंदिराला दान केले आहे, मी मेलो तरी ते कोणतेही संस्कार करणार नाहीत. म्हणूनच मला माझी मालमत्ता त्यांना द्यायची नाही. माझा दुसरा मुलगा आणि मुलगी घराच्या एका भागात राहतात. माझी पत्नी आणि मी इथे राहतो तोपर्यंत ते इथे राहू शकतात. पण ज्या क्षणी मी मरेन त्या क्षणी मंदिरच्या ताब्यात घर असेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App