छत्तीसगड विधानसभेचे भूमिपूजन झाले होते खासदार सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधींच्या हस्ते; भाजपचा नव्हता बहिष्कार!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे 2023 रोजी सावरकर जयंती दिनी होत असताना यासाठी त्या ऐतिहासिक कार्यक्रमावर बहिष्कार घालणारे काँग्रेसचे नेते एका महत्त्वाच्या गोष्टीकडे काणाडोळा करत आहेत, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर म्हणजे वैधानिक पदावर आहेत. पण काँग्रेसमध्ये मात्र खासदार पद यापेक्षा कोणत्याही वैधानिक पदावर नसताना दस्तुरखुद्द सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभेचे भूमिपूजन केले आहे. ही वस्तुस्थिती आता समोर आली आहे. Foundation stone of Chhattisgarh’s new assembly building was laid by Sonia Gandhi and Rahul Gandhi.

छत्तीसगडमध्ये स्वतंत्र राज्य निर्मितीनंतर रायपुर मध्ये प्रथमच नव्या विधानसभेचे निर्माण करण्यात आले. या भवनाच्या भूमिपूजनाचा समारंभ खासदार श्रीमती सोनिया गांधी यांच्या हस्ते आणि खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत 29 ऑगस्ट 2020 रोजी झाला. या समारंभाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे ऑनलाईन उपस्थित होते.

या समारंभाची कोनशिला नव्या विधानसभा भवनाच्या भूमिपूजनाला नेमके कोण उपस्थित होते?, हे स्पष्ट करते. या कोनशिलेवर मुख्यमंत्री भूपेश बघेल, विधानसभेचे अध्यक्ष चरणदास महंत, छत्तीसगडचे लोक निर्माण अर्थात सार्वजनिक बांधकाम मंत्री ताम्रध्वज साहू तसेच संसदीय कामकाज मंत्री रवींद्र चौबे आणि मुख्य म्हणजे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते धरमलाल कौशिक यांची नावे आहेत.

छत्तीसगडमध्ये सध्या भाजप विरोधी पक्षात आहे आणि धरमलाल कौशिक हे भाजपचे आमदार म्हणून विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांचे नाव या कोनशिलेवर आहे. याचा अर्थ भाजपने विरोधी पक्षात असताना देखील छत्तीसगड विधानसभेच्या भूमिपूजन समारंभावर बहिष्कार घातलेला नव्हता, हे स्पष्ट झाले आहे. सोनिया गांधी या फक्त खासदार पदावर असताना त्यांनी छत्तीसगड विधानसभेचे भूमिपूजन केले आणि त्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार घातला नव्हता, हे यानिमित्ताने अधोरेखित होत आहे.

Foundation stone of Chhattisgarh’s new assembly building was laid by Sonia Gandhi and Rahul Gandhi.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात