विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिरोमणी अकाली दलाच्या कारकिर्दीत पंजाबमध्ये अंमली पदार्थांचा व्यापार वाढला अशी टीका करणाºया आम आदमी पक्षाच्या (आप) एका माजी आमदाराला पोलीसांनी मनी लॉँड्रिंगप्रकणी अटक केली आहे. अमली पदार्थ प्रकरणातील टोळीचे ते साथीदार असल्याचा संशय आहे.Former MLA , AAP-Congress leader arrested for money laundering
पंजाबचे माजी आमदार सुखपाल सिंह खैरा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात अटक केली. ५६ वर्षीय खैरा यांच्या ठिकाणांवर मागील मार्च महिन्यांत धाडी टाकण्यात आल्या होत्या. अमली पदार्थ प्रकरणातील दोषी व बनावट पासपोर्ट टोळीचे ते साथीदार आहेत,
असा ईडीचा आरोप आहे. मात्र, त्यांनी आरोपाचा इन्कार केला. केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा आपल्याला लक्ष्य करीत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी नुकताच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
खैरा यांनी २०१७मध्ये पंजाबच्या कपूरथळा जिल्ह्यातील भोलाथ विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या (आप) तिकिटावर निवडणूक जिंकली होती. त्यांनी जानेवारी २०१९मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता व पंजाब एकता पाटीर्ची स्थापना केली होती. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये गेले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App