फोर्ड ने महिंद्राला केले ‘ गुड बाय ‘ ;  भागीदारी रद्द ; महिंद्राच्या उत्पादनांवर परिणाम नाही


  • अमेरिकेतील फोर्ड मोटर कंपनी आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्यातील पूर्वी घोषित करण्यात आलेली भागीदारी फिस्कटली आहे. ही भागीदारी आगामी काळात होणार नसून ती रद्द करण्यात आली आहे. 
  • अमेरिकन कार निर्माता फोर्ड मोटर आणि भारतीय कार निर्माता महिंद्रा अँड महिंद्रा यांनी गेल्या वर्षी संयुक्त उद्यम जाहीर केला होता.आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी फोर्ड महिंद्राला आणि अमेरिकन ब्रँड फोर्ड ला भारतात जम बसवण्यासाठी मदत करणार होते.
  • तथापि, 2020 च्या अखेरीस, दोघांनी अनेक कारणांमुळे संयुक्त उद्यम संपविण्याचा निर्णय घेतला .

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्लीः अमेरिकेतील फोर्ड मोटर कंपनी आणि महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यांच्यातील पूर्वी घोषित करण्यात आलेली भागीदारी फिस्कटली आहे. ही भागीदारी आगामी काळात होणार नसून ती रद्द करण्यात येत असल्याचे या कंपन्यांकडून  सांगण्यात आले.Ford and Mahindra to end collaboration on all projects in India

या वर्षाच्या सुरूवातीस, फोर्ड इंडियाने भारतासाठी आपले नवीन धोरण तयार करेपर्यंत त्यांच्या सर्व योजना महिंद्रा सोबत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता.  पण आता अलीकडील  वृत्तानुसार अमेरिकन वाहन निर्माता फोर्ड
कंपनीने महिंद्राबरोबरची सर्व भागीदारी संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

फोर्ड महिंद्राबरोबर भागीदारी करून भारतात तीन नवीन एसयूव्हीवर काम करत होता. यातील एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही होती जी मूळत: पुढच्या वर्षी भारतात लॉन्च होईल. महिंद्रा निर्मित, ही फोर्ड सी-एसयूव्ही नवीन एसयूव्ही 500 च्या व्यासपीठावर तयार केली जाणार होती. परंतु आता असे दिसते आहे की फोर्डला आता हे उत्पादन एकट्यानेच  विकसित करायचे आहे.

दोन कंपन्यांमधील भागीदारीचा बेत संपुष्टात आला असला तरी भारतात स्वतंत्ररीत्या व्यवसाय सुरूच राहील, असे फोर्ड मोटरने सांगितले . त्याचवेळी आपल्या नव्या वाहनांच्या उत्पादनावर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे महिंद्रा अॅण्ड महिंद्राने सांगितले  महिंद्रा अॅण्ड महिंद्रा एसयूव्ही प्रकारच्या वाहनांच्या निर्मितीवर तसेच विजेवरील वाहनांच्या निर्मितीवरही लक्ष केंद्रित करणार आहे.

महिंद्राबरोबरच्या भागीदारी संपुष्टात आणण्याचा फोर्डचा निर्णय अनेक विषयांवर आधारित आहे, वृत्तानुसार भारतीय बाजारपेठेत फोर्डची स्थिती फारशी चांगली नाही, यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम फर्ले यांनी फोर्डच्या जागतिक स्थितीवर लक्ष  केंद्रित केले आहे. त्यांनी जागतीक स्थितीला प्राधान्य यादीवर ठेवले आहे. याव्यतिरिक्त, कोविड -19 महामारीत आर्थिक परिस्थितीमुळे फोर्डने महिंद्रबरोबरची भागीदारी संपविण्याचा निर्णय घेतला आहे.

वरील दोन्ही कंपन्यांनी ऑक्टोबर 2019 मध्ये भागीदारी करार केला होता. त्यानुसार 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही भागीदारी प्रत्यक्षात येणार होती. परंतु आता दोन्ही कंपन्यांनी आपापल्या भांडवलाची पुनर्रचना करून ते व्यवसायासाठी वापरण्यासाठीचे प्राधान्यक्रम बदलल्यामुळे हा भागीदारी करार संपुष्टात आला आहे.

Ford and Mahindra to end collaboration on all projects in India

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात