पंढरपूर वारीच्या परवानगीसाठी विहिपीचे १७ जुलैला आंदोलन ;बंधने फक्त शिस्तप्रिय वारक-यांवर का ?

विशेष प्रतिनिधी

पुणे : देशात सर्वत्र जनजीवन सामान्य होत असताना, हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणा-या शेकडो-हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारक-यांच्या उपासनेच्या या मुलभूत अधिकारावर गदा का आणण्यात येत आहे ?For permission of Pandharpur Wari VHP’s agitation on July 17

महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मग, वारीला विरोध का करण्यात येत आहे. कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने फक्त शिस्तप्रिय वारक-यांवर का लादली जात आहेत ? असा सवाल करत विश्व हिंदू परिषदेच्यावतीने येत्या १७ तारखेला राज्यभर आंदोलन करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र गोव्याचे क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी दिली.  • पंढरपूरच्या वारीसाठी विहिपीचे १७ जुलैला आंदोलन
  • पायी वारीला परवानगी देण्याची मागणी
  • लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात
  • हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा सुरु
  • कोरोनाचे सर्व नियम पाळण्यास वारकरी तयार

For permission of Pandharpur Wari VHP’s agitation on July 17