वृत्तसंस्था
पुर्णिया : देशात भाजप विरोधातले सर्व प्रादेशिक पक्ष ऐक्याची भाषा बोलत असताना ते दुसऱ्या अन्य एका एकजुटीची भाषाही बोलू लागली आहेत. शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांच्या पाठोपाठ राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुसलमानांना एकजूट दाखविण्याचे आवाहन केले आहे. बिहारमध्ये पूर्णिया जिल्ह्यात महागठबंधन रॅलीला संबोधित करताना लालूप्रसाद यादव यांनी मुस्लिमांच्या एकजुटीचे आवाहन केले आहे. Following Pawar, Ambedkar, Lalu Prasad also appealed to Muslims for unity
त्याआधी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या उपस्थितीत परदेशात जिवंत असलेल्या आणि मेलेल्या मुसलमानांनाही मतदानासाठी आणायची घोषणा राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक मेळाव्यात करण्यात आली होती. त्या पाठोपाठ प्रकाश आंबेडकर यांनी देखील मुसलमानांनी साथ दिली, तर मोदी 2024 मध्ये पंतप्रधान बनू शकणार नाहीत अशी मुंबईतून हाळी दिली.
हेच ते प्रकाश आंबेडकर आहेत, जे शरद पवारांना महाराष्ट्रातल्या शिवसेना वंचित बहुजन आघाडी मधून वगळू इच्छितात. पण मुसलमानांच्या एकजुटीबाबत मात्र ते पवारांच्याच मताशी सहमती राखतात.
महाराष्ट्रात अशा पद्धतीने पवार आणि आंबेडकर मोदी विरोधात मुसलमानांच्या एकजुटीची भाषा बोलत असताना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात देखील लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये महागठबंधन जिंकून आणण्यासाठी आणि केंद्रात मोदींचा पराभव करण्यासाठी मुसलमानांना एकजुटीचे आवाहन केले आहे. तुम्ही लोक नुसते हिंदू – हिंदू – हिंदू करत बसू नका. आम्ही हिंदू आहोत. पण मुसलमानांच्या विरोधात नाही. तुम्ही सर्व अल्पसंख्यांकांचे रक्षण करा. त्यांच्या मदतीनेच आपल्याला 2024 मध्ये मोदींना हरवायचे आहे, अशा शब्दांमध्ये लालूप्रसाद यादव यांनी महागठबंधनच्या रॅलीत मुसलमानांच्या एकजुटीचे आवाहन केले.
या रॅलीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची देखील भाषणे झाली. या दोन्हीही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर यावेळी जोरदार हल्लाबोल चढवला होता. पण यातले मुख्य भाषण गाजले ते लालूप्रसाद यादव यांचे. कारण त्यांनी देखील आपले जुनेच राजकारणाचे वळण आळवत अल्पसंख्यांक रक्षणाची भाषा केली. आता ही भाषा कितपत फलद्रूप होते की सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष मुस्लिमांचे ध्रुवीकरण करत असताना दुसरीकडे हिंदू मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App