वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खासगी कंपन्यांना देण्यात येणाऱ्या लशींचे दर निश्चित केले आहेत. त्या अंतर्गत कोव्हिशिल्डसाठी 780 रुपये तर कोव्हॅक्सिन 1410 रुपये किंमत निश्चित केली आहे. स्पुटनिक व्ही या लसीसाठी 1145 रुपये किंमत ठरविली आहे.Fixed rates for vaccines in private hospitals; Covishield at Rs 780 and Covacin at Rs 1410
कोव्हिशिल्ड लसीचा प्रति डोस 780 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 600 रुपये लसीची किंमत असून 30 रुपये जीएसटी आणि 150 रुपयांच्या सेवा शुल्काचा समावेश आहे.
कोव्हॅक्सिन ही लस 1410 रुपयांना मिळणार आहे. यामध्ये 1200 रुपये लसीची किंमत असून 60 रुपये जीएसटी आणि 150 रुपयांचे सेवा शुल्क आहे. तर स्पुटनिक व्ही ही लस 1145 रुपये प्रति डोस दराने देण्यात येईल. यामध्ये 948 लसीची किंमत असून 47 रुपये जीएसटी आणि 150 रुपयांचे सेवा शुल्काचा समावेश आहे.
लशींच्या दर ठरवण्यासोबतच दररोज देखरेखही ठेवली जाणार आहे. अधिक रक्कम घेतल्यास संबंधित कोरोना लसीकरण केंद्रावर कारवाई केली जाईल. रुग्णालयांना 150 रुपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क आकारता येणार नाही, असे केंद्राने स्पष्ट केले. यावर राज्य सरकारांना देखील देखरेख ठेवावी लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App