प्रियंका गांधींच्या पीएविरुद्ध एफआयआर, अर्चना गौतम यांनी केले गंभीर आरोप – जाणून घ्या संपूर्ण वाद

प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेश पोलिसांनी बिग बॉसची माजी स्पर्धक अर्चना गौतम यांना धमकी दिल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांच्या पीए विरुद्ध एससी- एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मेरठच्या एसपींनी सांगितले की, संदीप सिंहविरोधात तक्रार आली होती. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.FIR against Priyanka Gandhi’s PA, Archana Gautam Makes Serious Allegations – Know the Full Controversy

प्रियांका गांधी यांनी गतवेळी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत महिलांना तिकिटांचे वाटप केले होते. अर्चना गौतम यांनीही मेरठमधील हस्तिनापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, अर्चना यांचा निवडणुकीत पराभव झाला. त्याचवेळी अर्चनाने प्रियंका गांधी वाड्रा यांचे पीए संदीप सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.



बिग बॉसच्या माजी स्पर्धक आहेत अर्चना गौतम

अर्चना यांनी फेसबुक लाईव्हवर सांगितले होते की, संदीप सिंहने त्यांना अपमानास्पद भाषा वापरली. अर्चना यांच्या म्हणण्यानुसार, संदीप सिंह यांनी त्यांना दोन पैशांची महिला म्हटले. तसेच आणखी काही म्हटले तर पोलिसांत देण्याची धमकी दिली होती. अर्चना यांनी संदीप यांच्यावर अनेक आरोप केले होते. अर्चना म्हणाल्या होत्या की, पीए संदीप यांची माणसे त्यांना प्रियंका गांधींना भेटू देत नाहीत. अशा स्थितीत प्रियांका यांच्यापर्यंत माझा मुद्दा पोहोचवण्याचा दुसरा मार्ग नव्हता. अर्चना यांनी म्हटले की, प्रियांका यांना भेटायला जवळपास एक वर्ष लागले.

अर्चना म्हणाल्या होत्या की, मी काँग्रेसमध्ये नाही तर प्रियंका गांधीसोबत सामील झाले होते. मी पक्षात आल्यावर अनेक विघ्नं दिसली. पक्षाचे लोक काँग्रेसचे नुकसान करण्यात मग्न आहेत. त्याचवेळी अर्चना यांनी संदीप यांच्याबद्दल म्हटले होते की, ते महिलांशी नीट बोलत नाहीत. ते सर्व महिलांशी अर्वाच्य भाषेत बोलतात. हिंमत असेल तर संदीपला तुरुंगात पाठवा, असे आव्हानही अर्चना यांनी दिले. त्याचवेळी, मेरठचे एसपी म्हणाले की, अर्चना यांच्या तक्रारीवरून आरोपी संदीप सिंहविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचे पथक या घटनेचा तपास करत आहे.

पोलिसांनी केला गुन्हा दाखल

संदीप सिंह यांच्यावर एससी एसटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना गौतम यांच्या वडिलांनी मेरठचे एसएसपी रोहित सजवान यांना तक्रार दिली होती. ज्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्चना यांच्या आरोपानुसार, ‘बिग बॉस’ शो संपल्यानंतर अर्चना गौतम रायपूर छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात प्रियंका गांधी वाड्रा यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. प्रियांका गांधी वाड्रा यांचे पीए संदीप सिंह यांनी अर्चना गौतम यांना भेटू दिले नाही. सर्वांसमोर गैरवर्तन केले आणि जातीवाचक शब्द वापरले, असा आरोप आहे. यासंदर्भात अर्चना यांच्या वडिलांनी 28 फेब्रुवारीला मेरठच्या एसएसपीकडे तक्रार केली होती.

FIR against Priyanka Gandhi’s PA, Archana Gautam Makes Serious Allegations – Know the Full Controversy

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात