विशेष प्रतिनिधी
मुंबई: दरवर्षी दिवाळी आली की सोशल मीडियावर बरेचसे फेक फोटो शेअर होत असतात. बऱ्याचदा हे फोटो नासाने शेअर केले आहेत असे सांगितले जाते. पण यावेळी मात्र नासाने दिवाळीच्या शुभेच्छा देणारा खराखुरा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Finally NASA shares genuine captivating pic to wish Diwali and put an end to all fake WhatsApp forwards
नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने अंतराळातील भरपूर सुंदर दृश्य टिपले आहेत. आकाशगंगेतील काही रहस्यमय फोटो तसेच ब्लॅक होलचे फोटो हबल टेलिस्कोपने टिपले आहेत. याच हबल टेलिस्कोपने एका आकाशगंगेतील सुंदर तारांगणाचे दृश्य टिपले आहे. तारांगणाचे हे सुंदर दृश्य पाहून अनेक नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
फटाके फोडू नका या ट्विटमूळे हर्षवर्धन कपूर ट्रोल नेटकऱ्यानी अनिल कपूर यांचा फोटो शेअर करत केली टीका
यावेळी मात्र नासाने दिवाळीसाठी एकदम परफेक्ट आणि खरा फोटो शेअर केला अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हा फोटो शेअर करून नासाने लोकांकडून शेअर केल्या जाणाऱ्या इतर सर्व फेक दिवाळी इमेजेसचा शेवट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App