उमेदवारी अर्ज दाखल करताना अटकेची भीती, पंजाबचे माजी मंत्री विक्रम मजिठिया यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याने अडचणीत वाढ


विशेष प्रतिनिधी

चंडीगढ : उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज कसा भरायचा असा प्रश्न पंजाबचे माजी कॅबिनेट मंत्री व शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रम मजिठिया यांच्यासमोर आहे. उमेदवारी अर्ज भरायला येताच पोलीस अटक करतील अशी भीती त्यांना वाटत आहे. कारण त्यांच्यावर अटकेची तलवार कायम आहे.Fear of arrest while filing nomination papers, ex-Punjab minister Vikram Majithia’s pre-arrest bail rejected

तस्करीचा आरोप असलेल्या मजिठिया यांचा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करणेच त्यांच्यासाठी अवघड बनले आहे.



मजिठा मतदार संघातून अर्ज दाखल करताना पोलीस त्यांना अटक करू शकतात. पंजाबमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी सुरू होत आहे. एक फेब्रुवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

मजिठियांच्या वकिलांनी हायकोर्टासमोर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यासाठी मुदत मागितली. परंतु, उच्च न्यायालयाचा आदेश आल्यावरच याबाबत स्थिती स्पष्ट होईल. मजिठिया यांचे तस्करांशी संबंध असल्याचा आरोप आहे.

त्यांच्याविरूद्ध मोहालीमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंह सिद्धू हे शिरोमणी अकाली दलाच्या विरोधातील निवडणुकीचा मुद्दा बनवत आहेत.

मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत केले आहे. मजिठियांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.काँग्रेस सरकारने कट रचून मजिठियांविरोधात गुन्हा दाखल केला. राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला आहे,असा आरोप अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी केला आहे.

Fear of arrest while filing nomination papers, ex-Punjab minister Vikram Majithia’s pre-arrest bail rejected

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात