मुस्लिम डिफेन्स फोर्सचा फतवा, सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणाऱ्या महिलांवर करणार कारवाई


मुस्लीम डिफेन्स फोर्स 24/7 नावाच्या संघटनेने नवा फतवा काढला आहे. बुरखा न घालणाऱ्या  आणि बुरखा काढून सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणा़ऱ्या मुस्लीम महिलांवर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी संघटनेने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. Fatwa of Muslim Defense Force to take action against women who take selfies in public places


विशेष प्रतिनिधी

मंगळुर : मुस्लीम डिफेन्स फोर्स 24/7 नावाच्या संघटनेने नवा फतवा काढला आहे. बुरखा न घालणाऱ्या आणि बुरखा काढून सार्वजनिक ठिकाणी सेल्फी काढणा़ºया मुस्लीम महिलांवर कारवाई करण्यात येईल, अशी धमकी संघटनेने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे.

मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशी कुमार यांच्या म्हणण्यानुसार, हा गट स्वत:ला मुस्लिम हक्कांचे रक्षक समजतो. या ग्रुपमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांनी सार्वजनिक ठिकाणी बुरखा काढून सेल्फी घेऊ नये, असं सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर सार्वजनिक ठिकाणी बुरखा न घालणाऱ्या  मुस्लीम महिलांवर हल्ला केला जाईल, अशी धमकी या संघटनेने दिली आहे.

पोलीसांनी सांगितले की, ते या ग्रुपवर सतत लक्ष ठेवून आहेत. हा मेसेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे त्यांनी सांगितले. इन्स्टाग्राम आणि फेसबुकशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवरही हा संदेश लोकांना दिला जात आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ही संघटना मुस्लीम महिलांना धार्मिक परंपरा मोडण्यापासून रोखणं हे त्यांचं कर्तव्य आहे, असं सांगून स्वत:ला मुस्लीम हक्कांचे रक्षक असल्याचे सांगत आहे

मंगळुरू पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, या संघटनेनं लोकांना धमकावले आहे आणि म्हटले आहे की, कुठेही मुस्लिम महिला बुरखा न घालता दिसली तर त्या महिलेला धडा शिकवू. पोलीस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार, त्यांची टीम सातत्याने या टोळीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, हे लोक कोण आहेत? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे या ग्रुपमधील काही सदस्यांची माहिती आहे, मात्र प्रत्यक्षात हा मेसेज कुठून आला आणि त्याचा मास्टरमाईंड कोण, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Fatwa of Muslim Defense Force to take action against women who take selfies in public places

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात