वृत्तसंस्था
भोपाळ : मध्य प्रदेशातील सिधी येथील चुरहट-रीवा राष्ट्रीय महामार्गावरील बरखारा गावात शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 17 प्रवाशांचा मृत्यू झाला. 50 जखमी झाले आहेत. त्यापैकी 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांपैकी 8 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित रुग्णालयात मरण पावले. ट्रकचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. ट्रकने मागून उभ्या असलेल्या तीन बसेसला धडक दिली. आतापर्यंत फक्त 7 मृतांची ओळख पटली आहे.Fatal road accident in Madhya Pradesh 17 killed, 40 injured, uncontrolled truck hits 3 buses
सतना येथे आयोजित कोल समाजाच्या महाकुंभात सहभागी होऊन या बसेस थेट परतत होत्या. या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री शिवराज सिंहदेखील सहभागी झाले होते. सीएम शिवराज सिधीमध्ये होते. माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले.
ट्रक सिमेंटने भरलेला होता, धडकेनंतर उलटला
रात्री 9 वाजता मोहनिया बोगद्यापासून काही अंतरावर हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. येथे एका भरधाव ट्रकने तीन बसला धडक दिली. दोन बस 10 फूट खोल दरीत कोसळल्या. त्याचवेळी महामार्गावरच एक बस उलटली. ट्रक सिमेंटने भरलेला होता, धडकेनंतर उलटला.
अपघातस्थळी बसेस चहा-पाण्यासाठी थांबल्या
सतना येथे आयोजित कोल जमाती महाकुंभ कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी विंध्य विभागातील सर्व जिल्ह्यांना लोकांना आणण्यासाठी 300 बस भरण्याचे टार्गेट देण्यात आले होते. सायंकाळी 5.30 वाजता कार्यक्रम संपला. सर्व बस सतनाहून थेट मोहनिया बोगद्यामार्गे रामपूर बघेलान आणि रेवामार्गे जात होत्या.
बोगद्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिधी जिल्ह्यातील चुरहट पोलिस स्टेशन हद्दीतील बरखडा गावाजवळ तीन बस काही काळ थांबल्या होत्या. येथे प्रवाशांसाठी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान, मागून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने तिन्ही बसेसला धडक दिली. तिन्ही बसमधून 50 ते 60 प्रवासी होते.
मृतांच्या नातेवाईकांना 10-10 लाख रुपये
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. रात्रीच मुख्यमंत्री शिवराज घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्माही उपस्थित होते. तत्पूर्वी, सिधीचे जिल्हाधिकारी आणि एसपींनीही घटनास्थळाची पाहणी केली. खासदार रीती पाठकही घटनास्थळी पोहोचल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते कमलनाथ, अजय सिंह यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App