प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप आपले रेकॉर्ड तोडून 125 ते 130 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता असल्याचे टीव्ही 9 च्या एक्झिट पोल मध्ये दिसून येत आहे. काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. अपक्ष किंवा छोटे पक्ष 3 ते 7 जागांवर अपक्ष बाजी मारू शकतील, तर आम आदमी पार्टीला 3 ते 5 मिळण्याची शक्यता आहे. Exit poll 2022 shows BJP will break it’s own record of 127 in gujrat, will retain its power in himachal Pradesh
जन की बात एक्झिट पोल
जन की बात यांच्या एक्झिट पोलनुसार 182 जागांपैकी भाजपला 129 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 43 जागा, आपला 10 जागा इतरांना एकही जागा न मिळण्याचा अंदाज आहे.
पी मार्कचा एक्झिट पोल
पी मार्क या संस्थेच्या अंदाजानुसार भाजपला १३८, काँग्रेसला ३६, आपला ६ आणि इतरांना २ जागा मिळण्याची शक्यता आहे. टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपला १२५ ते १३०, काँग्रेसला ४० ते ५० आपला ३ ते ५ आणि इतरांना ३ ते ७ जागा मिळू शकतात.
या सगळ्या एक्झिट पोलचा अर्थ भाजप आपले 127 जागांचे जुने रेकॉर्ड तोडणार असाच होत आहे
हिमाचलात पुन्हा भाजप
हिमाचल प्रदेशात ३४ ते ३९ जागा भाजपला, तर काँग्रेसला २८ ते ३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात आप तसेच इतर पक्षांना एकही जागा मिळणार नाही, असे एक्झिट पोल सांगतो आहे.
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. गेल्या २७ वर्षांपासून भाजपची सत्ता गुजरातमध्ये आहे. हे घवघवित यश आहे. अँटी इन्कंबन्सीचा भाजपला याचा फटका बसणार नाही. १२५ पेक्षा जास्त जागा भाजपला मिळतील, असंही उपाध्ये यांनी सांगितलं.
काँग्रेसचे राजू वाघमारे म्हणाले, एक्झिट पोल हे शेवटी अंदाज आहेत. आमच्या अंदाजाप्रमाणे यापेक्षा जास्त जागा मिळतील. ८० ते ८५ पर्यंत जागा काँग्रेसला मिळतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App