Excise case : मनीष सिसोदियांच्या अडचणीत वाढ, ‘ईडी’ने मागितली दहा दिवसांची कोठडी!

Manish Sisodia

मनीष सिसोदिया यांनी इतर लोकांच्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल खरेदी केल्याचाही ईडीचा दावा

प्रतिनिधी

Manish Sisodia News : आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. सीबीआयनंतर आता ईडीने कोर्टाकडे त्यांच्या दहा दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे. कोर्टात मनीष सिसोदिया यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दयान कृष्णन यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला आहे. Excise case  Manish Sisodia brought to Rouse Avenue court ED to seek 10 day custody

कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने सांगितले की, नवीन मद्य धोरणामुळे बड्या लोकांना फायदा झाला. दक्षिण भारतातील कंपन्यांनाही या धोरणाचा फायदा पोहचवला गेला. एवढंच नाहीतर मनीष सिसोदिया यांनी इतर लोकांच्या नावाने सिमकार्ड आणि मोबाईल फोन खरेदी केल्याचा दावाही ईडीने कोर्टात केला आहे.


‘’… आणि हो, घरगड्याला ‘गाजराचा हलवा’ वाटने साहजिकच आहे’’ उद्धव ठाकरेंच्या टीकेला भाजपाकडून प्रत्युत्तर!


सुनावणीदरम्यान ईडीने न्यायालयाला सांगितले की, नवीन मद्य धोरण बनवण्यामागे षडयंत्र होते. तपास यंत्रणेने राऊस अॅव्हेन्यू कोर्टात सांगितले की, विजय नायरने इतरांबरोबर हा कट रचला होता. नवीन मद्य धोरण ठोक विक्रेत्यांना भरमसाठ नफ्यासाठी आणले गेले होते.

यादरम्यान, ईडीने विजय नायर आणि के कविता (बीआरएस एमएलसी) यांच्या भेटीबाबतही न्यायालयाला सांगितले. ईडीने सांगितले की, आरोपी बुचीबाबू गोरंटलाने खुलासा केला आहे की तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि के कविता यांच्यात राजकीय सामंजस्य होते, ज्यांनी विजय नायरचीही भेट घेतली होती. बुचीबाबू हे के कविताचे माजी स्वीय सहायक असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

Excise case  Manish Sisodia brought to Rouse Avenue court ED to seek 10 day custody

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात