पाकिस्तान सरकारकडून मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये दरदिवशी 11 बलात्काराच्या घटना होतात. खरंतर वास्तविक आकडेवारी यापेक्षा कितीतरी अधिक असल्याचं सांगितलं जातं. Ex Wife criticize Imran Khan over controversial statement on rape.
विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बलात्कारावरुन अकलेचे तारे तोडले यानंतर त्यांची चांगलीच कोंडी झाली. आधी स्वतःच्याच देशातून विरोध पाहावा लागलेल्या इम्रान खान यांना आता त्यांच्या दोन्हीही घटस्फोटीत पत्नींनी देखील चांगलंच सुनावलंय. जेमिमा गोल्डस्मिथ आणि रेहम खान असं इम्रान खान यांच्या घटस्फोटीत पत्नींची नावं आहेत. इम्रान यांनी बलात्काराच्या घटनांना अश्लिलता आणि पाश्चिमात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृतीला जबाबदार असल्याचं विधान केलं होतं. त्यावरुन चांगलाच वाद उभा राहिलाय.
वादग्रस्त वक्तव्यावरुन इम्रान यांची घटस्फोटीत पत्नी जेमिमा गोल्डस्मिथ ट्विट करत म्हणाल्या, “कुराणमध्ये पडद्याची जबाबदारी पुरुषांवर आहे. त्यामुळे यानुसार इम्रान यांनी आपल्या समर्थकांना स्वतःच्या डोळ्यावर संयम ठेवण्यास आणि खासगी अवयवांना पडद्यात ठेवण्यास सांगावं. मी ज्या इम्रानला ओळखत होते ते असं कधीच बोलत नव्हते. उलट ते पुरुषांना त्यांच्या डोळ्यांवर पडदा ठेवण्यास सांगत.”
“Say to the believing men that they restrain their eyes and guard their private parts." Quran 24:31 The onus is on men. https://t.co/StkKE3HIPM — Jemima Goldsmith (@Jemima_Khan) April 7, 2021
“Say to the believing men that they restrain their eyes and guard their private parts." Quran 24:31
The onus is on men. https://t.co/StkKE3HIPM
— Jemima Goldsmith (@Jemima_Khan) April 7, 2021
इम्रानने आपलं तोंड बंद ठेवणं हेच सर्वांच्या भल्याचं, रेहम खानकडून इम्रान यांची दुसरी घटस्फोटीत पत्नी आणि ब्रिटिश-पाकिस्तानी पत्रकार रेहम खान यांनी तर इम्रानला थेट तोंड बंद ठेवण्याचा सल्ला दिलाय. रेहम म्हणाल्या, “इम्रान जितकं कमी बोलती तितकं ते सर्वांसाठी चांगलं असेल.” रेहमने आपल्या ट्विटमध्ये जेमिमा यांच्यावरही निशाणा साधला. “आज एक तरुण मुलगी महिलांनी पडदा पद्धत बंद करावी म्हणत आहे. मात्र, हीच मुलगी पाकिस्तानमध्ये राहत असताना डोक्यापासून पायांपर्यत कपड्यांमध्ये झाकलेली दिसत होती.”
#Pakistan 's Tehreek-e-Insaf chairman #ImranKhan 's third wife #BushraManek has reportedly returned back to her maternal home following a domestic dispute over the ex-cricketer's pet dogs. Read @ANI Story | https://t.co/XWj1cKEHp5 pic.twitter.com/Ci6g56fScV — ANI Digital (@ani_digital) April 25, 2018
#Pakistan 's Tehreek-e-Insaf chairman #ImranKhan 's third wife #BushraManek has reportedly returned back to her maternal home following a domestic dispute over the ex-cricketer's pet dogs.
Read @ANI Story | https://t.co/XWj1cKEHp5 pic.twitter.com/Ci6g56fScV
— ANI Digital (@ani_digital) April 25, 2018
इम्रान खान नेमकं काय म्हणाले
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रविवारी 2 तास नागरिकांशी फोनवर चर्चा करत त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. या दरम्यान एका नागरिकाने त्यांना सरकार बलात्कार आणि लहान मुलांच्या शोषणाच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहे असा प्रश्न विचारला.
यावर इम्रान खान यांनी या घटनांबद्दल नाराजी व्यक्त करत निषेध केला. ते म्हणाले, “लैंगिक शोषण ‘अश्लीलते’मुळे होते. ही अश्लीलता पाश्चिमात्य आणि भारतीय संस्कृतीतून येते. यानंतर त्यांनी धर्मावर आपलं म्हणणं मांडत इस्लाम धर्मात बुरखा घालणं महत्त्वाचं असल्याचं मत व्यक्त केलं. यामुळे ‘प्रलोभनाला नियंत्रित’ करता येतं असा दावा त्यांनी केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App