राष्ट्रपतीपदाची निवडणूक शरद पवार यांनीच लढवावी. देशात सध्या त्यांचा इतका जेष्ठ नेता नाही, अशी आग्रही भूमिका शिवसेनेने ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या बैठकीत मांडली आहे. ममता बॅनर्जी यांनी बोलावलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीला तेलंगण राष्ट्र समिती, आम आदमी पार्टी आणि एमआयएम वगळता बहुतेक सर्व पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्व पक्षाच्या नेत्यांनी प्रामुख्याने शरद पवार यांच्या नावाचा पहिला आग्रह धरला. परंतु त्यातही शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई यांनी शरद पवारांच्या नावाचा विशेष आग्रह धरला. Even after Sharad Pawar’s refusal, Shiv Sena insists on his name
शरद पवारांनी स्वतःहूनच राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीतून आपले नाव बाजूला घेतले आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार निवडून येणार ही संख्याबळाच्या आधारे दगडावरची पांढरी रेघ आहे. त्यामुळेच शरद पवारांनी आपले नाव राष्ट्रपती पदाच्या शर्यतीतून मागे घेतले आहे. तरी देखील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी त्यांच्या नावाचा आग्रह धरणे आणि बाकीच्या पक्षनेत्यांनी त्यांना दुजोरा देणे याचा नेमका राजकीय अर्थ काय?? शिवसेनेला नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत आपल्या दुसऱ्या उमेदवाराचा झालेल्या पराभवाचा बदला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत घ्यायचा आहे का?? अशी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असल्यास त्यात नवल नाही!!
पण त्या पलिकडे जाऊन नीट विचार केला तर शरद पवार यांचा राष्ट्रपती व्हायला नकार आणि शिवसेनेचा त्यांच्याच नावाचा आग्रह या दोन्ही बाबी राजकीय वस्तुस्थिती स्पष्ट करतात. शरद पवार हे विरोधी पक्षांचे उमेदवार झाले तरी निवडून येणार नाहीत ही संख्याबळाच्या आधारे 100 % सत्य गोष्ट आहे. पण त्याचबरोबर शिवसेनेचा ज्या कारणासाठी शरद पवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे, की शरद पवार यांच्यासारखा ज्येष्ठ नेता विरोधकांकडे दुसरा उपलब्ध नाही ही देखील तितकीच सत्य बाब आहे!!
– विरोधकांची कोंडी
त्यामुळे एक प्रकारे शरद पवार यांचे नाव पुढे करून सर्व विरोधकांनी आपलीच राजकीय कोंडी करून घेतल्याचे दिसून येते. अर्थात सुभाष देसाई यांनी शरद पवार यांचे नाव सुचवताना त्यांना जर ते मान्य नसेल तर विरोधी आघाडीने बिगर राजकीय आणि देशभरात चांगली प्रतिमा असलेला नेता अथवा व्यक्ती राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवडावे, अशी सूचना केली आहे. या सुचनेत देखील पुरेसे राजकीय चातुर्य दिसते आहे. या निवडणुकीत पराभवाची 100 % टक्के खात्री आहे, तरी देखील विरोधकांच्या आग्रहाला कोण बळी पडू शकेल??, हा देखील खरा प्रश्न आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App