इस्त्रोच्या अर्थ ऑब्जरवेशन सॅटेलाइटसाठी GSLV-F10 रॉकेटने उड्डाण केलं पण अवघ्या काही क्षणात या रॉकेटच्या क्रायोजेनिक इंजिनात बिघाड झाल्याने हे मिशन पूर्ण होऊ शकलं नाही. EOS-3 Satellite Launch : Isro fails to put Gisat-1 in orbit as cryo stage fails to ignite
वृत्तसंस्था
श्रीहरिकोट्टा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रो (ISRO) आज सकाळी 6.45 वाजता एक नवा इतिहास रचण्यापासून मुकलं आहे. कारण अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात रॉकेटमधील क्रायोजेनिक इंजिनामध्ये गडबड झाली. ज्यामुळे पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-3)ची GSLV-F10 ही मोहीम अयशस्वी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रॉकेटने उड्डाण देखील केलं. मात्र, काही मिनिटांनीच या रॉकेटचा कंट्रोल रुमशी संपर्क तुटला.
GSLV-F10 launch took place today at 0543 Hrs IST as scheduled. Performance of first and second stages was normal. However, Cryogenic Upper Stage ignition did not happen due to technical anomaly. The mission couldn't be accomplished as intended. — ISRO (@isro) August 12, 2021
GSLV-F10 launch took place today at 0543 Hrs IST as scheduled. Performance of first and second stages was normal. However, Cryogenic Upper Stage ignition did not happen due to technical anomaly. The mission couldn't be accomplished as intended.
— ISRO (@isro) August 12, 2021
मिशन कंट्रोल सेंटरने रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजेनिक इंजिनमधून 18.29 मिनिटांनी सिग्नल आणि डेटा देणं बंद केलं होतं. यानंतर, मिशन कंट्रोल सेंटरमधील शास्त्रज्ञांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसून लागला होता. काही काळ शास्त्रज्ञ डेटा मिळण्याची आणि अधिक माहितीची वाट पाहत होते. नंतर मिशन डायरेक्टरने इस्रोचे प्रमुख डॉ. के. सीवन यांना सर्व माहिती दिली. यानंतर, इस्रो प्रमुखांनी सांगितले की, क्रायोजेनिक इंजिनमध्ये तांत्रिक दोष आढळला आहे. यामुळे हे मिशन पूर्णपणे यशस्वी होऊ शकले नाही.
#WATCH | Indian Space Research Organisation's GSLV-F10 lifts off successfully from Satish Dhawan Space Centre, Sriharikota (Source: DD) pic.twitter.com/2OV8iA06Xf — ANI (@ANI) August 12, 2021
#WATCH | Indian Space Research Organisation's GSLV-F10 lifts off successfully from Satish Dhawan Space Centre, Sriharikota (Source: DD) pic.twitter.com/2OV8iA06Xf
— ANI (@ANI) August 12, 2021
त्यानंतर इस्रोने जाहीर केले की मिशन अंशत: अपयशी ठरले आहे. त्यानंतर लगेचच इस्रोद्वारे चालवले जाणारे थेट प्रक्षेपण बंद करण्यात आले. जर हे मिशन यशस्वी झाले असते, तर या उपग्रहाने सकाळी साडेदहाच्या सुमारास भारताची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली असती.
EOS-3 (Earth Observation Satellite-3) ला जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हीकल-एफ 10 (Geosynchronous Satellite Launch Vehicle-F10) पासून प्रक्षेपित करण्यात आले. हे रॉकेट 52 मीटर उंच आणि वजन 414.75 टन होते. त्याचे तीन टप्पे होते. यामध्ये 2500 किलोपर्यंत जियोट्रांसफर ऑर्बिट उपग्रह वाहून नेण्याची क्षमता आहे.
EOS-3 उपग्रहाचे वजन 2268 किलो आहे. EOS-3 उपग्रह हा आजपर्यंतचा भारताचा सर्वात वजनदार उपग्रह आहे. जियोट्रांसफर ऑर्बिटमध्ये गेल्यानंतर उपग्रहाने आपल्या प्रक्षेपणामुळे निश्चित कक्षेत स्वतःची स्थापना केली असती. परंतु तो तिथपर्यंत पोहोचू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App