युपीत अतिक अहमदचा मुलगा असद – मकसूदचा मुलगा गुलाम यांचा एन्काऊंटर; खासदार असदुद्दीन ओवैसींचा संताप

वृत्तसंस्था

हैदराबाद : उत्तर प्रदेशात उमेश पाल हत्याकांडातील संशयित आरोपी माफिया अतिक अहमदचा मुलगा असद आणि मकसूदचा मुलगा गुलाम यांचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या मुद्द्यावरून हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. Encounter of Asad son of Upit Atiq Ahmed – Ghulam son of Maqsud

तुम्ही जुनैद आणि नसीर यांना मारणाऱ्यांचा एन्काऊंटर करणार नाही. कारण तुम्ही धर्माच्या आधारावर एन्काऊंटर करता. त्यासाठी न्यायव्यवस्थेलाही धुडकावता. कोर्ट, न्यायाधीश, संविधान, सरकारी वकील हे कशासाठी आहेत? न्यायदानासाठी आहेत. पण तुम्हाला त्यांचा न्याय मान्य नाही. तुम्हाला कायद्याचे राज्य मान्य नाही आणि म्हणूनच तुम्ही एन्काऊंटर करत सुटला आहात. तो देखील धर्माच्या नावावर, असा आरोप खासदार ओवैसी यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद याचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार मकसूदचा मुलगा गुलाम यांनी उमेश पाल ह्यांची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर दोघेही फरार झाले होते. ते दोघे झाशीत लपले असल्याची माहिती खबर यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी असद आणि गुलाम या दोघांना पकडण्यासाठी जाळे लावले होते. मात्र पोलीस संबंधित ठिकाणी पोहोचताच त्या दोघांनी पोलिसांवर गोळीबार चालू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल केलेल्या गोळीबारात त्या दोघांचा एन्काऊंटर झाला.

त्यानंतर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून उमेश पाल यांची पत्नी आणि आई या दोघींनी योगी सरकारचे आभार मानले आहेत. याच मुद्द्यावर खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेश सरकार धर्माच्या नावावर एन्काऊंटर करत सुटले आहे आणि ते आरोपींच्या घरांवर बुलडोजर चालवतात. त्यांना संविधान, कायदा कोर्ट आणि न्याय यांची जाड उरलेली नाही, असा आरोप ओवेसी यांनी केला आहे.

Encounter of Asad son of Upit Atiq Ahmed – Ghulam son of Maqsud

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात