लखीमपूर खेरी घटनेच्या राजकारणातून कॉँग्रेसचे नेतृत्व मजबुतीने उभे राहणणार, छे…म्हणत लोकांच्या हाती निराशाच लागणार असल्याचे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांचे मत


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी प्रकरणात राजकारण करत राज्यातील आपली पाळेमुळे रोवण्याचा प्रयत्न कॉँग्रेस करत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनीच त्याचा समाचार घेतला आहे. ग्रॅँड ओल्ड पार्टी म्हणत कॉँग्रेसला हिणवत मुळ ढाचा बदल घडविल्याशिवाय या पक्षाला भवित्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.Election strategist Prashant Kishor says that the Congress leadership will stand strong in the politics of Lakhimpur Kheri incident is a dream

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकºयांचा वाहनाखाली येऊन मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने चार जणांची हत्य केली. या प्रकरणात केंद्रीय गृह राज्य मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा वाहनात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.त्यावरून राजकारण करत कॉँग्रेसच्या सरचिटणिस प्रियंका गांधी आणि खासदार राहूल गांधी यांनी लखीमपूर येथे भेट दिली. त्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य संचारल्याचे म्हटले जात आहे.

मात्र, प्रशांत किशोर यांनी यावर म्हटले आहे की, ज्यांना अशी अपेक्षा आहे की लखीमपूर खेरीच्या घटनेमुळे ग्रँड ओल्ड पार्टी , म्हणजे काँग्रेसचे नेतृत्त्व असलेले विरोधक मजबुतीने उभा राहील, त्यांच्या हाती निराशा लागणार आहे. दुर्दैवाने जीओपीच्या खोल समस्यांचे आणि त्याच्या ढाच्याच्या कमजोरीचे कोणतेही त्वरित समाधान नाही.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या घटनेनंतर लखीमपूर खेरीला रवाना झाल्या होत्या, परंतु उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर प्रियांकाला सीतापूरच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले. गेस्ट हाऊसमध्ये प्रियांकाने झाडू लावून त्यांच्या अटकेचा निषेध केला होता.

Election strategist Prashant Kishor says that the Congress leadership will stand strong in the politics of Lakhimpur Kheri incident is a dream

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण