कोविड नियमावली पाळा, अन्यथा रॅली, रोड शो, जाहीर सभा रद्द करू; झाडून सगळ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा दणका

वृत्तसंस्था

नवी दिल्ली :  देशभर कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड वाढत असताना तसेच पश्चिम बंगालच्य़ा निवडणूकीत शेवटच्या तीन टप्प्यांचे मतदान राहिले असताना निवडणूक आयोगाने सगळ्या राजकीय पक्षांना कोविड नियमावली पाळण्याचा बडगा दाखविला आहे.Election Commission writes to all national & state parties, asking them to follow all COVID related guidelines

कोविडची नियमावली कठोरपणे पाळा अन्यथा झाडून सगळ्या राजकीय पक्षांच्या रॅली, पदयात्रा, रोड शो, संपर्क अभियान, जाहीर सभा वगैरे कार्यक्रम रद्द करू, असा गंभीर इशारा निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना पत्र लिहून दिला आहे.केंद्र सरकारने जारी केलेली कोविड नियमावली निवडणूक आयोगाने या पत्रासोबत जोडली आहे. जिल्हा, राज्य, राष्ट्रीय सर्व स्तरांवरील पक्षांना, त्यांच्या नेत्यांना, उमेदवारांना सारखीच नियमावली पाळावी लागेल. कोणतीही हयगय केलेली खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे.

सर्व राजकीय पक्षांचे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका, गाव स्तरांवरचे नेते, अपक्ष नेते, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, स्टार प्रचारक, रॅली आयोजक, सहभागी कार्यकर्ते, निवडणूकीशी सर्व संबंधित

व्यक्ती आणि व्यक्तीसमूह यांना कोविड नियमावलीचे पालन करावेच लागेल. मास्क लावणे तसेच अन्य वैद्यकीय नियम पाळणे बंधनकारकच असेल, असेही निवडणूक आयोगाने पत्रात स्पष्ट केले आहे.

नियमावली न पाळणाऱ्या कोणत्याही पक्षाला, नेत्याला, उमेदवाराला, प्रतिनिधीला, कार्यकर्त्याला निवडणूक आयोगाच्या कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Election Commission writes to all national & state parties, asking them to follow all COVID related guidelines