वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राजधानी नवी दिल्लीत लॉकडाउनमुळे पहिल्या चार आठवड्यात सुमारे ८ लाख मजुरांनी स्थलांतर केले. कोरोनाची लाट रोखण्यासाठी राजधानीत १९ एप्रिल रोजी लॉकडाउन लागू करण्यात आले. त्यानंतर राजधानीतून अस्थायी मजुर आपल्या गावी परतली लागले. चौदा मे पर्यंत सुमारे ८०७,०३२ मजूर दिल्लीतील तीन आंतरराज्यीय स्थानकातील बसच्या मदतीने गावी गेले. Eight lack workers migrated towards home
या बसची व्यवस्था दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड सरकारने केली आणि याशिवाय जादा बसही सोडण्यात आल्या. परिवहन विभागाच्या अहवालात म्हटले की, दिल्ली सरकारने शेजारील राज्यात विशेषत: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या परिवहन अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून सुमारे ८ लाख मजुरांना कोणत्याही अडचणीशिवाय स्वगृही जाण्यास मदत केली. १९ एप्रिल रोजी दिल्लीत विकएंड संचारबंदीचे रूपांतर सहा दिवसांच्या संपूर्ण लॉकडाउनमध्ये झाले. त्यावेळी शहरात दररोज सरासरी २० हजार रुग्ण आढळून येत होते. चाचणी करणारा प्रत्येक तिसरा व्यक्ती हा कोरोनाबाधित असल्याचे आढळून येत होते. आतापर्यंत स्थलांतरित मजुरांसाठी २१,८७९ बसच्या फेऱ्या झाल्या आणि त्यापैकी ८०७४ फेऱ्या पहिल्या आठवड्यातील होत्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App