माफिया अतिक अहमदच्या १५ निकटवर्तीयांवर ‘ED’चे छापे; तब्बल १०० कोटींच्या बेनामी संपत्तीचा खुलासा!

५० पेक्षा अधिक बेनामी कंपन्याही आढळून आल्या आहेत.

विविध प्रतिनिधी

प्रयागराज : उमेश पाल हत्येप्रकरणी प्रयागराजमध्ये चौकशीसाठी आणलेल्या माफिया अतिक अहमदच्या आर्थिक साम्राज्याला बुधवारी मोठा धक्का बसला. त्याच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासात गुंतलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने एकाच वेळी बसपाचे माजी आमदार आसिफ जाफरी यांच्यासह त्यांच्या १५ निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये शहरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजीव अग्रवाल, कार शोरूमचे मालक दीपक भार्गव आणि चायलचे माजी आमदार आसिफ जाफरी यांच्यासह अतिकचे अकाउंटंट यांचा समावेश आहे. ED raids 15 close associates of mafia Atiq Ahmed

यावेळी एक कोटींची रोकड, दागिने आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. यासोबतच आतापर्यंतच्या तपासात १०० कोटींची बेनामी संपत्तीही समोर आली आहे. ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

अंमलबजावणी संचालनालयाच्या वेगवेगळ्या पथकांनी सकाळी अतिकच्या जवळच्या मित्रांच्या ठिकाणांवर छापे टाकले. कारली, लुकरगंज, धूमगंज तसेच सिव्हिल लाइन्समध्ये असलेल्या माफियांच्या जवळच्या लोकांच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू केल्याने खळबळ उडाली. पथकांनी ओळखल्या गेलेल्या लोकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर छापे टाकले. येथे प्रथम संपूर्ण संकुल ताब्यात घेण्यात आले. प्रवेशद्वार बंद करण्यात आले आणि बाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते. यानंतर शोध घेण्यात आला.

सूत्रांचे म्हणणे आहे की, ईडीने ज्या लोकांच्या ठिकाणांवर छापे टाकले ते मनी लाँड्रिंग प्रकरणात रडारवर आहेत. अतिकविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासात ईडीला त्यांच्या आणि माफिया व त्याच्या खास गुंडांमधील व्यवहाराचे पुरावे मिळाले आहेत. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

ईडीच्या कारवाईदरम्यान ५० पेक्षा अधिक बेनामी कंपन्याही सापडल्या आहेत. या अशा कंपन्या आहेत ज्यात अतिक आणि त्याच्या कुटुंबाचा थेट कोणताही अधिकार नाही, परंतु पडद्यामागे या कंपन्या अतिक आणि त्याचे कुटुंब चालवत होते. याशिवाय सुमारे २०० बँक खात्यांचीही माहिती मिळाली असून, त्याद्वारे माफिया आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जात होती.

ED raids 15 close associates of mafia Atiq Ahmed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात