म्युच्युअल फंडचे वितरक बना अनू मिळवा फायदा


नेहमी ध्यानात ठेवा पैसा हे सर्वस्व नव्हे पण असे सरधोपट वाक्य उच्चारण्याआधी तो तुम्ही भरपूर प्रमाणात मिळवला आहात याची खात्री करण्याची गरज असते असे वाक्य प्रख्यात गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे यांनी एका ठिकाणी उधृत केले आहे. याचा साधा सोपा अर्थ म्हणजे पैसे महत्वाचा आहेच. तो मिळवल्यानंतर त्याचा विनियोग तुम्ही अनेक चांगल्या बाबींसाठीही करू शकता. सध्याच्या जगात तर पैशाशिवाय काहीच शक्य नाही. अर्थात पैसे तुम्ही कसा मिळवता यालाही महत्व आहे. Will make money by MF distributers

तो जर चांगल्या मार्गाने मिळवला तर त्यातून मनःशांती मिळते. त्यातून आणखी उन्नती करता येते. त्यातून यशाचे नवे मार्ग चोखाळता येतात. त्यानंतर मग पैशांजवळ पैसा येवू लागतो असे म्हटले जाते. गेल्या काही वर्षांत भारतात मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचे गुंतवणुकीचे मार्गही बदलले आहेत. त्यातील एक मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. यात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या जसजशी वाढत आहे तसे ते वितरित करणाऱ्यांची कमतरता भासत आहे. म्युच्युअल फंड विकणे हे विम्यापेक्षाही सोपे आहे. सध्याच्या घडीला बाजारात जवळपास ३२ म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल हजारो कोटीत आहे. तुम्हा एकाचवेळी सर्वांसाठी वितरक म्हणून काम करता येते.

यात आधी कमिशन दोन ते अडीच टक्केच मिळायचे. पण तेही आता बंद झाले आहे. पण तुम्ही गुंतवणूकदारांकडूनच फि घेवू शकता. अर्थात ती नाही घेतली तरी यावर दरसाल गुंतवणूकिच्या एकूण बाजार मुल्यावर सरासरी ०.५ टक्के दराने ट्रेल कमिशन मिळते. म्हणजेच एकदा का तुमच्या मार्फत झालेल्या गुंतवणूकिचे एकूण बाजारमुल्य मुल्य १०० कोटी झाले कि तुम्हाला वार्षीक ५० लाख उत्पन्न जोपर्यंत गुंतवणूक आहे तो पर्यंत मिळत रहाते व बाजारमुल्य तर नेहमिच कमी जास्त होत असते. याच्या जोडीला तुम्ही रिझर्व्ह बॅकेचे बॉंड, सरकारि रोखे, पीएमएस, खाजगी कंपन्यांचे कर्ज रोखे विकू शकता. जनरल इंशुरन्स क्षेत्रातही ब-याच कंपन्या आहेत कोणत्याही एका कंपनीसाठी काम करता येते. वरिल चारहि एजन्सीज घेउन उत्तम सेवा व प्रमाणिकपणे काम केल्यास एक उत्तम व्यवसाय संधी आहे.

Will make money by MF distributers

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात