पैसे मिळवताना कधीही अल्प संतुष्ट राहू नका


असं म्हणतात की माणूस आयुष्यभर विद्यार्थी अवस्थेतच असतो. सतत काही ना काहीतरी शिकत राहणे म्हणजे उत्तम प्रकारे जगणे! पैसे कमवायचे असतील तर ज्ञान कमवायची तयारी ठेवली पाहिजे. नवनवीन गोष्टी शिकून त्या आचरणात आणल्या पाहिजेत. नोकिया ही कंपनी एकेकाळी मोबाईल जगाची सम्राट होती पण नवीन तंत्रज्ञानाकडे केलेले दुर्लक्ष त्यांना एवढे भारी पडले की ती कंपनी काही काळ बंद करावी लागली. स्वतःला अपडेट ठेवणे हे सगळ्यात महत्वाचे आहे. Never be complacent when it comes to earning money

आपण जे काही करत असू त्यातले नवीन ज्ञान सतत मिळवत राहा. त्यामुळेच तुम्ही तुमच्या इतर स्पर्धकांच्या नेहमी पुढे राहू शकता. त्याचप्रमाणे अल्प संतुष्ट राहू नका. दर दिवशी, प्रत्येक सेकंदाला आपण निर्णय घेत असतो. या लहान-मोठ्या निर्णयांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो. प्रत्येक निर्णय, कितीही छोटा का असेना, महत्वाचा असतोच. त्यामुळे आपण सतत सतर्क राहायला हवे. आयुष्यात किती आणि कसे पैसे कमवायचे हा तुमचा निर्णय असतो..

तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागतो व तो घेण्यासाठी तुम्हाला स्वतःला काही प्रश्न विचारायची गरज असते, जसे की मी माझं सगळं कर्ज लवकरात लवकर कधीपर्यंत फेडू शकतो? त्यासाठी मला काय करावं लागेल? माझ्या सध्याच्या नोकरी, व्यवसायापलीकडे मी जास्तीचे पैसे कमवण्यासाठी अजून काय करू शकतो?

माझ्या वागण्यात किंवा कामाच्या पद्धतीत असा कोणता बदल गरजेचा आहे की ज्याच्यामुळे मला अधिक फायदा होईल? जे आपल्याकडे आहे त्यात समाधानी राहण्याने आपली प्रगती खुंटते आणि नवीन मार्ग आपण शोधू शकत नाही. सतत आज आहोत त्यापेक्षा पुढे जायची धडपड करत राहणे गरजेचे आहे. अर्थात यात अधासी असणे वेगळे आणि रोज थोडी थोडी वाढ करत राहणे वेगळे. अधाशी राहण्यान मन कीच भरत नाही आणि मानसिक शांतीही लाभत नाही. पण कालच्यापेक्षा उद्या जास्त कमावणे म्हणजे अधाशिपणा नव्हे. कारण महागाई दराचा विचार करता हे आवश्यकच असते.

Never be complacent when it comes to earning money

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात