मनी मॅटर्स : करबचतीच्या दृष्टीने लिक्विड फंडातील गुंतवणूक केव्हाही अधिक फायदेशीर


सध्याचे बॅंकांचे व्याजदर व त्यात भविष्यात होणारी आणखी घसरण विचारता घेता सामान्य गुंतवणूकदाराने विविध पर्यायाकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे. पारंपारिक गुंतवणुकीतून होणारे नुकसान विचारात घेता योग्य सल्लागाराचा सल्ला घेऊन लिक्विड फंडात गुंतवणूक जरूर करावी. घर, जमीन यासारख्या विक्री व्यवहारातून, निवृत्तीनंतर किंवा बॅंकेतील ठेवीची किंवा पीपीएफची मुदत संपल्यावर किंवा शेअर्स वा म्युच्युअल फंड विक्रीतून मोठी रक्कम आपल्या खात्यात जमा होणार असेल व अशी रक्कम आपल्याला एकरकमी गुंतवायची नसेल, तर काय करता येईल याचा आपण कधी विचार केला आहे का. जर ही रक्कम बचत खात्यात राहिली, तर सध्या केवळ साडे तीन टक्केच व्याज मिळू शकते. Money Matters: Liquid Fund Investments Are Ever More Profitable In terms of tax savings

यावर लिक्विड म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय आहे. म्युच्युअल फंडाच्या लिक्विड स्कीममधील गुंतवणूक विविध प्रकारच्या अल्प मुदतीच्या पर्यायात केली जाते. ज्याची मुदत पुढील ९१ दिवसांत संपणार असते. असे असले तरी बहुतेक म्युच्युअल फंड ज्या गुंतवणूक पर्यायांची मुदत पुढील वीस दिवसांतच संपणार आहे, असे पर्याय प्रामुख्याने निवडतात. जेणेकरून अशी गुंतवणूक तुलनेने कमी जोखमीची होते. शिवाय सहा ते सात टक्के इतका परतावा मिळू शकतो. विशेष म्हणजे आपण रक्कम गुंतविल्यापासून ते रक्कम काढेपर्यंत वरील दराने परतावा मिळू शकतो आणि आपल्याला हवी तेवढी रक्कम हवी तेव्हा काढता येते. आपल्याला जर अशी रक्कम शेअर्स अथवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवायची असेल आणि बाजार तेजीत असेल, तर अशावेळी आपल्याकडील रक्कम लिक्विड फंडात गुंतवून त्यातून योग्य वेळी शेअर्समध्ये किंवा एसटीपी पद्धतीने आपल्याला हव्या त्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवू शकता. असे करण्याने बाजारात तेजीमुळे असणारी जोखीम आपण कमी करू शकतो. करबचतीच्या दृष्टीनेसुद्धा लिक्विड फंड हे बचत खाते अथवा अल्प मुदतीच्या ठेवींपेक्षा फायदेशीर ठरू शकतात. अर्थात कोणत्या फंडात गुंतवणूक करायची हे मात्र तज्ञालाचा विचारावे हे नक्की.

Money Matters : Liquid Fund Investments Are Ever More Profitable In terms of tax savings

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण