आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका


क्राईम शो म्हणजे हमखास टीआरपी खेचणारे शो असतात. त्यात ते सत्य घटनेवर आधारित असतील तर, त्यांचा खास असा प्रेक्षकवर्ग तयार होतो. या टीव्ही शोजमुळे गुन्हेगारांना मार्गदर्शन मिळते अशी ओरड होत असली, तरीही यामध्ये दाखविण्यात येणाऱ्या काही घटना बघून मात्र अशा घटनांपासून स्वतःला सुरक्षित कसे ठेवता येईल, याबद्दलचे मार्गदर्शनही मिळते. फसवणुकीचे गुन्हे अनेक प्रकारचे असतात. फसवणुकीला बळी पडणाऱ्या व्यक्ती श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अडाणी अशा कोणत्याही प्रकारच्या असू शकतात. Don’t fall victim to financial fraud

प्रत्येकाची कथा वेगळी, प्रत्येकाच्या समस्याही वेगळ्या. प्रत्येकालाच वाटत असते की माझेच दुःख मोठे आहे. पण दुःखाची ही भावनाच गुन्हेगारांचे प्रमुख हत्यार आहे. सावज हेरताना गुन्हेगार सर्वात आधी त्याची दुखरी नस ओळखतो आणि बरोबर त्यावरच फुंकर मारतो. समाजामध्ये प्रत्येकाला असणाऱ्या समस्यांचे खालील प्रकारात वर्गीकरण करता येईल. व्यक्तिगत समस्या सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या भावनिक बाजूसही निगडित असतात. सोशल मीडिया हा सायबर गुन्हेगारांचा प्रमुख अड्डा आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर सतत सक्रिय असणारे, छोट्याशा कौतुकाने भाळणारे, स्वप्नांच्या विश्वात वावरणारे, स्वतःला एकाकी समजणारे अनेक दुःखी चेहरे या समस्येने ग्रस्त असतात.

केवळ सोशल मीडियामुळेच नव्हे तर, वास्तवातही अशा व्यक्ती सहजपणे गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. यातून वाचण्यासाठी सावधगिरी कशी बाळगायची याची माहिती हवी. यासाठीच आपल्या कौटुंबिक समस्या, निकटवर्तीयांवरचा क्षणिक राग, दुःख या गोष्टी शक्यतो अगदी जवळच्या व खात्रीच्या व्यक्ती सोडून कोणालाही सांगू नका. आवश्यकता वाटल्यास कौटुंबिक सल्लागाराचा सल्ला घ्या. विनाकारण उठसूठ कोणालाही आपल्या समस्या सांगत बसू नका. कारण यानिमित्ताने तुमच्या जवळ यायची संधी तुम्ही अपरिचित लोकांना देत असता. यातून लोक तुमच्या आर्थिक परिस्थीतीचा, अडचणींचा अंदाज बांधतात आणि दुखरी नस ओळखून बरोबर गैरफायदा उठवतात. सायबर गुन्हेगार तर नेहमी याचा अभ्यास करीत असतात. कोणालाही बॅंकेच्या अकाउंटची, एटीएमच्या पिनची माहिती कदापी देवू नका. नेट बॅंकिग करीत असाल तर कोणालाही त्याचा पासवर्ड सांगू नका.

Don’t fall victim to financial fraud

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात