वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पृथ्वी – 2 या लघू पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 रोजी ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास यशस्वी चाचणी करण्यात आली. हे क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली आहे आणि लक्ष्यावर अचूक मारा करण्यास सक्षम आहे.Earth – Successful test of 2 short-range ballistic missiles
या चाचणी दरम्यान क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालन आणि तांत्रिक मापदंडांची यशस्वी पडताळणी करण्यात आली.
300 किलोमीटर एवढी मारक क्षमता
यापूर्वीही, ओडिशातली बालासोर किना-यावर या मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणीही यशस्वी ठरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. पृथ्वी – 2 हे एक स्वदेशी बनावटीचे आण्विक दृष्ट्या सक्षम असे मिसाईल आहे. या मिलाईलची मारक क्षमता 350 किलोमीटर एवढी आहे. एवढेच नाही, तर हे मिसाईल वाॅरहेड्स वाहून नेण्यासही सक्षम आहे. तसेच, या मिसाईलला दोन इंजिन आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App