पाकिस्तानातून धुळीचे वादळ, महाराष्ट्रात प्रभाव; मास्क वापरण्याचा तज्ञाचा सल्ला


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या वाळवंटी भागातून २३ जानेवारी २०२२ रोजी भारताच्या दिशेने धुळीचे वादळ आले आहे. त्यामुळे मास्क वापरण्याचा सल्ला तज्ञानी दिला आहे. Dust storm from Pakistan, impact in Maharashtra; Expert advice to use a mask

हे धुळीचे वादळ गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांत प्रभाव पाडत आहे. या मुळे धुळीचे कण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या भागात पसरत चालले आहेत.अगोदरच कोरोनामुळे मानवी श्वसन यंत्रणा कमकुवत झाली आहे. त्यात धुळीच्या वादळामुळे धुळी कण वातावरणात पसरत आहेत. त्यापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वादळापाठोपाठ वाऱ्याचा वेगही वाढलेला आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात घट होणार आहे. धुळीच्या आणि थंडीच्या प्रभावाने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क लावून बाहेर पडावे. श्वसन विकार असलेल्यांनी खास काळजी घेण्याची गरज आहे. त्यांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Dust storm from Pakistan, impact in Maharashtra; Expert advice to use a mask

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात