विशेष प्रतिनिधी
मुंबई : तृणमुलने काँग्रेससह इतर पक्षांमधील काही ‘अस्थिर लोकांना’ पक्षात घेतलं आहे. ही वृत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांना शोभत नाही. तृणमुलच्या उपस्थितीचा भाजपला सर्वाधिक फायदा होणार आहे,अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.Due to Trinamool, only BJP will benefit the most in Goa, Sanjay Raut criticizes Mamata Banerjee
गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधील ‘रोखठोक’ या साप्ताहिक स्तंभात राऊत म्हणाले की, गोव्यात निवडणुकांचं वातावरण आहे.
आता तृणमूलच्या खांद्यावर बसून भाजपला गोवा पुन्हा जिंकायचे आहे. तृणमूल काँग्रेस व आपसारखे पक्ष गोव्यात येऊन पैशांचा वारेमाप वापर करतात. गोव्याची संस्कृती आणि पर्यावरण आधीच बिघडले. त्यात पैशांचा पाऊस सुरू झाल्याने सगळेच बिघडले.
स्वत:च्या प्रतिमेवर निवडून येतील असे सर्व लोक तृणमूल काँग्रेसने जाळ्यात ओढल्याचा आरोप करून संजय राऊत यांनी म्हटले आहे की, चर्चिल आलेमाव यांचा मूळ पक्ष कोणता हे त्यांनाही आठवत नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते होते. आता तेही तृणमूलमध्ये गेले.
अशा काही अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील नव्या सकाळचे स्वप्न पडले आहे. हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारे नाही. गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपशी लढणाऱ्या ममता बॅनजीर्ही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात.
याचा फायदा शेवटी कोणाला होणार? गोव्यातील भाजपचे आमदार व संभाव्य उमेदवार हे एकजात हिस्ट्री-शिटर्स आहेत. अफू-चरसचा व्यापार करणारे लोक उघडपणे भाजपात प्रवेश करतात व मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात असे चित्र रोज दिसते.
प्रत्येक जण सौदेबाजी करीत आहे. गोव्यात एका बाजूला मंदिरे तर दुसऱ्या बाजूला भव्य चर्च आहेत. दोन्ही प्रार्थनास्थळांत घंटानादाचे महत्त्व आहे. या घंटा आता धोक्याच्या ठरू नयेत इतके गोव्याचे राजकीय वातावरण बिघडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App