130 कोटी लोकसंख्येच्या खंडप्राय भारत देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवणे म्हणजे संपूर्ण युरोप खंड किंवा दक्षिण अमेरिका खंडाचे लसीकरण करण्याइतका प्रचंड मोठा कार्यक्रम आहे. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक देशातील अनेक राज्यांमध्ये झाला असल्याने परिस्थिती आणखी कठीण झाली. मात्र सरकार यातूनही निर्धाराने मार्ग काढत आहे. देशातील लसीकरण उत्पादनाचा वेग वाढवण्यात आला आहे. लस उत्पादक कंपन्यांना सोयीसुविधा सवलती पुरवल्या जात आहेत. याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. Dr. Reddy’s will vaccinate 12.5 crore Indians
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील महत्त्वाचे औषध निर्माते डॉ. रेड्डीज यांनी येत्या 8 ते 12 महिन्यात देशातील साडेबारा कोटी नागरिकांना कोरोनावरील स्पुटनिक लस देण्याचा निश्चय जाहीर केला आहे. देशातल्या दोन राज्यांसोबत त्यांची चर्चा चालू आहे.
या लसीकरणातील सुरुवातीचे 15-20 टक्के लसीकरण रशियातून आयात केलेल्या लसीद्वारे केले जाईल. डॉ. रेड्डीजचे कार्यकारी उपाध्यक्ष एम. व्ही. रामण यांनी सांगितले की, येत्या दोन महिन्यात सुमारे साडेतीन कोटी डोस देण्याचा करार आम्ही केला आहे. जुनच्या मध्यावधीपर्यंत लसींची आयात होईल.
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने म्हटले आहे की, रशियातून आयात होणाऱ्या स्पुटनिक या कोरोना लसीची प्रती डोस किंमत 948 रुपये अधिक जीएसटी म्हणजेच 995 रुपये 40 पैसे इतकी निर्धारीत केली आहे.
सरकार आणि खासगी वितरण या दोन्हीसाठी लसीची किंमत एकच ठेवली जाईल. कंपनीने सांगितले की मेट्रो शहरांमधील रुग्णालयांसोबत आम्ही काम करु की जी लसीसाठी आवश्यक 18 अंश सेल्सिअस तापमानाची काळजी घेऊ शकतील.
लसींचा पुरवठा, वितरण याबद्दलचा सविस्तर तपशील नंतर निश्चित केला जाईल. स्पुटनिक लाईट या एकदाच घेण्याच्या लसीचीही आयात डॉ. रेड्डीज लवकरच करणार असल्याचे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App