तालिबानला अनुकूल सूर काढून डॉ. फारुख अब्दुल्ला फसले; त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीने घुमजाव केले!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी आज अफगाणिस्तानातील तालिबानी राजवटीवर सकाळी अनुकूल सूर काढले होते. मात्र, देशभरातून त्यावर टीकेचा भडिमार होताच डॉ. फारुक अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पार्टीने ताबडतोब घुमजाव केले. डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी तालिबान विषय कोणतेही अनुकूल मत व्यक्त केलेले नाही, असा खुलासा नॅशनल कॉन्फरन्सच्या ट्विटर हँडल वरून करण्यात आला आहे. Dr Farooq’s statement on Afghanistan is simply an invocation of Human Rights

 

 

डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी आज त्यांचे वडील शेख अब्दुल्ला यांच्या स्मृतीदिनानिमित्त कबरीवर जाऊन प्रार्थना केली. त्यावेळी पत्रकारांनी तालिबान विषयावर त्यांना प्रश्न विचारला. त्यावेळी डॉ. फारुख अब्दुल्ला म्हणाले होते, की अफगाणिस्तान स्वतंत्र देश आहे. तालिबानची राजवट इस्लामी कायद्यानुसार तेथील जनतेशी माणुसकीचा व्यवहार करेल. तालिबानी राजवटीने इतर देशांत बरोबरही शांतता आणि सौहार्द असे संबंध ठेवावेत, असा सल्ला डॉ. फारूक अब्दुल्ला यांनी दिला होता.

त्यावर सोशल मीडिया आणि मीडियातून डॉ. अब्दुल्ला यांनी तालिबानला अनुकूल भूमिका घेतल्याच्या बातम्या आल्या. त्यामुळे ते सोशल मीडियावर ट्रोल झाले. त्यानंतर त्यांच्या नॅशनल कॉन्फरन्स या पार्टीने डॉ. फारूक अब्दुल्ला यांचे वक्तव्य मीडियाने चुकीचे प्रसिद्ध केल्याचा दावा करत त्यांनी तालिबानला अनुकूल भूमिका घेतली नसल्याचा खुलासा केला आहे.

Dr Farooq’s statement on Afghanistan is simply an invocation of Human Rights

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात